करण जोहरने आयुष्मानसोबत सुद्धा काम करण्यास दिला होता नकार - Majha Paper

करण जोहरने आयुष्मानसोबत सुद्धा काम करण्यास दिला होता नकार

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येने अनेकांना मोठा धक्का बसला आहे. सुशांतच्या आत्महत्येसाठी अनेकजण बॉलिवूडमधीलन घराणेशाहीला जबाबदार धरत आहेत. खासकरून करण जोहरला सोशल मीडियावर निशाणा बनवला जात आहे. आता अभिनेता आयुष्मान खुराणाचे पुस्तक ‘क्रॅकिंग द कोड : द जर्नी इन बॉलिवूड’मधील काही अंश सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात सांगण्यात आले आहे की कशाप्रकारे निर्माता करण जोहरने 2007 मध्ये आयुष्मानला नाकारले होते.

आपल्या पुस्तकात आयुष्मानने सांगितले की, रेडिओ जॉकी असताना त्याने करण जोहरची मुलाखत घेतली होती. 2007 मध्ये एका पुरस्कार सोहळ्यावेळी त्याने करणकडे नंबर मागितला होता व सांगितले होते की त्याला अभिनेता बनायचे आहे. आयुष्मानने सांगितले की, जेव्हा मी करणला भेटलो तेव्हा त्याने मला लँडलाईन नंबर दिला. मला तेथेच समजायला हवे होते. मात्र मी खूप उत्साही होतो. मी कधी कॉल करायचा अशी सर्व योजना बनवली होती. सकाळी 11 वाजता, त्यावेळी त्याचा नाष्टा झाला असेल व करण उपस्थित असेल. दुसऱ्या दिवशी फोन केला तेव्हा त्यांनी सांगितले की करण ऑफिसमध्ये नाही. दुसऱ्या दिवशी कॉल केल्यावर व्यस्त असल्याचे सांगितले. जेव्हा तिसऱ्या दिवशी कॉल केला, त्यावेळी त्यांना रागात सांगितले की, आम्ही केवळ स्टार्ससोबत काम करतो व तुमच्यासोबत काम करू शकत नाही.

मात्र आज आयुष्मान बॉलिवूडमध्ये शिखरावर पोहचला आहे. कोणतेही बॉलिवूड बॅकग्राउंड नसताना त्याने यश संपादन केले आहे. एवढेच नाही तर 2018 मध्ये त्याला करणचा शो ‘कॉफी विद करण’मध्ये देखील बोलवण्यात आले होते.

Leave a Comment