सुशांतच्या आत्महत्येनंतर करण जोहरने ट्विटरवर अनेक अकाऊंटना केले अनफॉलो


वयाच्या ३४ व्या वर्षी राहत्या घरी अभिनेता सुशांत सिंह राजपूतने गळफास लावून आत्महत्या केली आणि साऱ्या कलाविश्वावर एकच शोककळा पसरली. पण सुशांतने केलेल्या आत्महत्येमुळे बॉलीवूडमधील काही प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत. ज्यामुळे कलाविश्वात पाय घट्ट रोवलेल्या घराणेशाहीवर अनेकांनी निशाणा साधला.

घराणेशाहीचा उल्लेख होताच बॉलिवूडमधील सेलिब्रिटी मंडळींना धारेवर धरत त्यांच्या पक्षपातीपणावर बोचरी टीका केली. आतापर्यंत अनेकदा सेलिब्रिटींच्याच मुलांना, नातेवाईक मंडळींना सिनेजगतात आदित्य चोप्रा, करण जोहर अशा निर्माता- दिग्दर्शकांनी प्राधान्य दिले आहे.

त्यातच बॉलीवूडचा गॉडफादर म्हणून ओळख असलेल्या निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने सुशांतच्या निधनानंतर दु:खही व्यक्त केले. पण, त्यानंतर त्याच्यावर उठलेली टीकेची झोड काही केल्या कमी होत नाही आहे. या सर्व प्रकारच्या पार्श्वभूमीवर करणने एक मोठा निर्णय घेतला. ट्विटरवर अनेक अकाऊंटना सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असणाऱ्या करण जोहरने अनफॉलो केले. त्यातच करणच्या फॉलोअर्सचा आकडा कमी होत असतानाच त्यानेही इतरांना फॉलो करणे बंद करणे ही बाब काहीशी खटकणारी ठरली.

करण सध्याच्या घडीला ट्विटरवर फक्त आठ अकाऊंट फॉलो करत आहे. ज्यामध्ये चार ही त्याच्या धर्मा प्रॉडक्शन या निर्मिती संस्थेशी संबंधित आहेत. तर उरलेल्या तीन अकाऊंटमध्ये बिग बी अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि नरेंद्र मोदी यांच्या अकाऊंटचा समावेश आहे. हे पाऊल करणने नेमके का उचलले याचे उच्चर अद्यापही अस्पष्ट असले तरी तो नेमकी काही प्रतिक्रिया या प्रकरणी देणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Comment