जाणून घ्या काय आहे भारताचा सहभाग असलेला ‘क्वाड’ गट ?, ज्याची चीनलाही वाटते भिती

चीन जगभरातील देशांना त्रास देत आहे. मात्र चीनलाही एका गट जोरदार शह देण्याचा प्रयत्न करतो तो म्हणजे क्वाड (क्वड्रीलेटरल सिक्टोरिटी डायलॉग). या गटात भारत, जपान, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका या देशांचा समावेश आहे. आशिया-पॅसिफिकमध्ये शांतता प्रस्थापित करणे आणि कोणत्याही प्रकारचे युद्ध होऊ नये याची काळजी घेणे, हा या गटाचा उद्देश आहे. क्वाडमुळेच चीन अस्वस्थ असतो. कारण हे चारही देश मिळून आपल्या विरोधात षडयंत्र रचत आहे असे त्याला वाटत असते.

Image Credited – Aajtak

क्वाड देशांच्या गटाचा हेतू स्वतंत्र, मुक्त आणि समावेशक प्रादेशिक आर्किटेक्चरची देवाणघेवाण करणे. प्रवासाचे स्वातंत्र्य, ओव्हर फ्लाइट इत्यादी गोष्टी संदर्भात काम करणे हा आहे. चीन या गटाला ‘आशियाई नाटो’च्या रुपात पाहत आहे. क्वाडद्वारे भारतात आर्थिक बदल आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. याद्वारे प्रशांत महासागर, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये पसरलेल्या विशाल नेटवर्कला जपान आणि भारताशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे एका देशातील उत्पादनांचा दुसऱ्या देशाला फायदा होईल.

Image Credited – Aajtak

मात्र चीनला वाटते की क्वाडला चीनच्या आजुबाजूच्या समुद्रात वर्चस्व स्थापन करू इच्छित आहे. कारण, क्वाड इंडो-पॅसिफिक पातळीवर कार्यरत आहे. हे भविष्यात चीनला लक्ष्य करू शकते. क्वाडच्या संदर्भात चीनला वाटते की हे अमेरिकेचे षडयंत्र आहे, ज्याद्वारे चीनचे वाढते अस्तित्व रोखण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. क्वाडला चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह (बीआरआय) च्या विरोधात पाहिले जात आहे. त्यामुळे चीनने आसियान देशांशी आपले संबंध दृढ करण्यास सुरुवात केली आहे. सर्व आशियाई देशांनी बीआरआयवर एकत्र काम करावे अशी चीनची इच्छा आहे.

Image Credited – Aajtak

चीनला भारताला प्रशांत महासागर क्षेत्रात क्वाड गटामुळे मिळणाऱ्या फायद्यामुळे चिंतेत आहे. चीनला क्वाड नेहमीच अडचण वाटले आहे. त्यामुळे भारत, जपान आणि ऑस्ट्रेलियाशी द्विपक्षीय संबंधांचा उपयोग करून चीन हे सुनिश्चित करेल की कनेक्टिव्हिटी आणि पायाभूत सुविधा, क्षमता वाढवणे, एचएडीआर, सागरी सुरक्षा, सायबर सुरक्षा आणि सुरक्षेवर लक्ष केंद्रित करणारी जागतिक सहकार्य प्रणालीच्या पलीकडे क्वाड पुढे जाऊ नये.

Leave a Comment