अ‍ॅमेझॉनच्या संस्थापकाने लॉकडाऊन काळात कमावले तब्बल 3 लाख कोटी


नवी दिल्ली : जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाऊन करण्यात आला होता. पण या लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे बंद असतानाच जगभरामधील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनचे संस्थापक आणि सीईओ जेफ बेजोस संपत्ती 4000 कोटी डॉलरने म्हणजेच साधारण 3.04 लाख कोटी रुपयांनी वाढल्याची नोंद ब्लूमबर्ग बिलेनिअर इंडेक्सने नोंदवली आहे. त्यानुसार जेफ बेजोस यांची कमाई आता 155 अरब डॉलर आहे. म्हणजेच त्यांची नेटवर्थ 11.7 लाख कोटी रुपये एवढी आहे.

गेल्या दोन महिन्यात जेफ बेजोस यांच्या संपत्तीमध्ये मोठी वाढ झाली आहे. जेफ बेजोस यांची संपत्ती कोरोनाच्या संकटकाळात 4000 कोटी डॉलरने म्हणजेच साधारण 3.04 लाख कोटी रुपयांनी वाढली आहे. जगभरात लॉकडाऊन सुरू होता असला तरी ई-कॉमर्स कंपन्यांचा व्यवसाय सुरू होता. त्यामुळे रोजच्या वापरातील वस्तूंच्या पुरवठ्यावर कोणताही अडथळा आला नाही.

अ‍ॅमेझॉनच्या वाढणाऱ्या शेअर्समुळे बेजोस यांच्या वाढत्या संपत्तीचा एक महत्त्वाचा हिस्सा आला आहे. ज्यावेळी इतर कंपन्यांसमोर आर्थिक संकट होते, त्यावेळी अ‍ॅमेझॉनचे शेअर्स तेजीमध्ये होते. कोरोनाच्या संकटकाळात 2000 डॉलरपेक्षाही वर या शेअर्सची किंमत होती. तज्ज्ञांच्या मते लॉकडाऊनच्या काळात लोक घरातच असल्यामुळे त्यांनी त्यांच्या गरजेच्या वस्तू ई-कॉमर्स साइटवरून मागवणे पसंत केले. त्यातच ई-कॉमर्स कंपन्यांनी वाढणाऱ्या मागणीमुळे नवीन नियुक्ती देखील केली आहे.

Leave a Comment