सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी मोठ्या कलाकारांविरोधात तक्रार दाखल - Majha Paper

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी मोठ्या कलाकारांविरोधात तक्रार दाखल


रविवारी मुंबईतील वांद्रे येथील आपल्या राहत्या घरी अभिनेता सुशांत सिंह राजपुत यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडवर एकच शोककळा पसरली. पण सुशांतच्या आत्महत्येमुळे बॉलीवूडमधील घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला. त्यातच बॉलीवूडमधील काही कलाकारांनी घराणेशाही सुरु अल्याचे मान्य करत, बॉलीवूडचा बुरखा फाडला. या कलाकारांमध्ये कंगना राणावत, शेखर कपूर, अभिनव कश्यप, प्रकाश राज यांचा समावेश होता.


करण जोहर, एकता कपूर, सलमान खान, संजय लीला भन्साळी यांच्यावर या प्रकरणावरून नेटकऱ्यांनी देखील मोठ्या प्रमाणात टीका केली आहे. या सर्वांवर टीका होत असतानाच या सर्वांविरोधात बिहारमधील एक वकिल सुधीर कुमार ओझा यांनी तक्रार दाखल केली आहे. आपण आपल्या तक्रारीत सुशांत सिंह राजपूतला सात चित्रपटातून काढून टाकण्यात आले होते, त्याचे काही चित्रपट प्रदर्शित होऊ दिले नाही. या अशा परिस्थितीने त्याला आत्महत्या करण्यासारखे मोठे पाऊल उचलायला भाग पाडल्याचे नमूद केले असल्याची माहिती ओझा यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिली. या प्रकरणी व्यावसायिक शत्रुत्वाच्या अँगलने देखील तपास केला जाईल असे महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील सांगितले आहे.

Leave a Comment