पोलिसांना दिलेल्या जबाबात सुशांतच्या वडीलांचा धक्कादायक खुलासा


रविवारी आपल्या वांद्रे येथील राहत्या घरी अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यानंतर आता त्याच्या आत्महत्येमागील कारणांचा पोलीस तपास करत आहेत. याच दरम्यान मुंबई पोलिसांना दिलेल्या जबाबामध्ये सुशांत सिंह राजपूतचे वडील केके सिंह यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. आपण तणावात असल्याचे सुशांत मला सांगितल्याचे वडील के. के. सिंह यांनी आपल्या जबाबात म्हटले आहे. गेल्या काही महिन्यांत सुशांतने मला दोन-तीन वेळा सांगितले होते की सध्या सिनेसृष्टीत सुरु असलेल्या तणावामुळे मी लो फिल करत असल्याचे सुशांतच्या वडिलांनी आपल्या जबाबात म्हटले आहे.

दरम्यान सुशांतच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, मी त्याला त्याच्या अडचणींबद्दल विचारण्याचा खूप वेळा प्रयत्न केला. त्याचबरोबर मी मदत करतो असेही त्याला सांगितले होते. पण या समस्येतून मी स्वत: बाहेर पडेन आणि लवकरच सर्व काही ठीक होईल, असे उत्तर त्याने मला दिले होते. सुशांतच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार माझ्यासमोर सुशांतने कधी ही नैराश्य हा शब्द वापरला नाही किंवा आजारपणावरील उपचारांबद्दलही सांगितले नाही. त्याचबरोबर त्याने कधीही अशा कोणत्याही व्यक्तीचा किंवा कंपनीचा उल्लेख केला नव्हता, ज्यांच्यामुळे तो डिप्रेशनमध्ये गेला होता.

म्हणजेच जे आरोप सुशांतच्या मृत्यूनंतर फिल्म इंडस्ट्रीवर केले जात आहेत ते खरे आहेत. तर, इंडस्ट्रीमधील दबावामुळे सुशांत नैराश्येतच्या गर्तेत गेला का आणि हेच सुशांतच्या आत्महत्येचे कारण आहे का? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

पाटणाला परतण्यापूर्वी सुशांतच्या वडीलांचा पोलिसांनी जबाब नोंदवला. सुशांतचे वडील केके सिंह आणि दोन बहिणींचे पोलिसांनी एका तासात जबाब नोंदवले. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, हे कुटुंब धक्क्यातून सावरलेले नसल्यामुळे त्यांचा सविस्तर जबाब घेणे शक्य नव्हते. परंतु आवश्यक असल्यास त्यांच्याकडून पुन्हा माहिती घेतली जाईल, जेणेकरुन सुशांतच्या मृत्यूचे कारण शोधायला मदत होईल.

आतापर्यंत सुशांतचे सहकारी, मॅनेजर, कर्मचारी आणि कुटुंबाव्यतिरिक्त काही मित्रांचे जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत. पोलिसांनी मंगळवारी (16 जून) रात्री उशिरापर्यंत सुशांतच्या मॅनेजर आणि कर्मचार्‍यांना विचारणा केली. ज्यात सुशांतची मागील सहा महिन्यांमधील प्रत्येक माहिती घेण्याचा प्रयत्न केला. पोलीस पुढच्या एक ते दोन दिवसांत सुशांतची कथित गर्लफ्रेण्ड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीचाही जबाब नोंदवण्यात येणार आहे. रिया लॉकडाऊनच्या काळात सुशांतसोबत होती. तिच्याकडून सुशांतच्या नैराश्याविषयी महत्त्वाची माहिती मिळेल अशी पोलिसांना आशा आहे.

दुसकीकडे सुशांतच्या आत्महत्येवरुन बॉलिवूडमधील अनेक बड्या व्यक्तिमत्त्वांवर अभिनेत्री कंगना राणावत, दिग्दर्शक शेखर कपूर यांनीही प्रश्न उपस्थित केले आहेत. सुशांत एका मोठ्या बॅनरखालील चित्रपटाच्या करारावरुन वादात साडडला होता. त्यानंतर फिल्म इंडस्ट्रीच्या बर्‍याच मोठ्या कंपन्यांनी सुशांतवर बंदी घातल्यानंतर सुशांत डिप्रेशनमध्ये गेला. अशा अनेक गोष्टी आता सुशांतच्या मृत्यूशी जोडल्या जात आहेत. आता मुंबई पोलीस या आरोपांबद्दल सत्य जाणून घेण्याचे काम करत आहेत. दरम्यान आतापर्यंत सुशांतने केलेल्या कामांची पूर्ण माहिती पोलीस घेत आहे. सुशांतसोबत काम केलेल्या सर्व लोकांच्या नावांची यादी केली आहे. त्याचबरोबर सुशांतच्या आतापर्यंतच्या सर्व कराराचीही माहिती पोलीस मिळवत आहेत.

Leave a Comment