ट्विटरवर सर्वाधिक फॉलो केले जाणारे हे आहेत टॉप-10 मुख्यमंत्री

स्मार्टफोन वापरणारी व्यक्ती फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम या सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नाही, असे क्वचितच पाहण्यास मिळते. आज प्रत्येकजण या प्लॅटफॉर्मचा वापर करतो. माहिती शेअर करण्यापासून ते प्रतिनिधींपर्यंत तक्रारी पोहचवण्यासाठी अशा अनेक गोष्टींसाठी या प्लॅटफॉर्म्सचा वापर होतो. अनेकदा सोशल मीडियामुळे गरजूंना मदत देखील मिळते.

राजकीय नेते देखील लोकांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियाचा भरपूर उपयोग करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोशल मीडियावर फॉलो केले जाणारे जगातील टॉपच्या नेत्यांपैकी एक आहेत. देशातील अनेक राज्यांचे मुख्यमंत्री देखील ट्विटर सारख्या प्लॅटफॉर्मद्वारे लोकांच्या संपर्कात राहतात. सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबाबत सांगायचे झाले तर  यामध्ये ट्विटर सर्वाधिक फॉलो केले जाणाऱ्या यादीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आहेत. केजरीवाल यांचे ट्विटरवर 19.4 मिलियन म्हणजेच 1.94 कोटी फॉलोअर्स आहेत. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे असून, 10 मिलियन फॉलोअर्ससह देशात सर्वाधिक फॉलो केले जाणारे ते दुसरे मुख्यमंत्री आहेत.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे @OfficeofUT या अकाउंटला 669.5 हजार आणि @CMOMaharashtra या अकाउंटला 1.9  मिलियन फॉलोअर्स आहेत.

ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्स असणारे टॉप 10 मुख्यमंत्री –

  1. दिल्ली – अरविंद केजरीवाल (@ArvindKejriwal) – 19.4 मिलियन
  2. उत्तर प्रदेश – योगी आदित्यनाथ (@myogiadityanath) – 10 मिलियन
  3. मध्यप्रदेश – शिवराज सिंह चौहान (@ChouhanShivraj) – 6.5 मिलियन
  4. बिहार – नितीश कुमार (@NitishKumar) – 5.7 मिलियन
  5. पश्चिम बंगाल – ममता बॅनर्जी (@MamataOfficial) – 4.3 मिलियन
  6. ओडिशा – नवीन पटनायक (@Naveen_Odisha) – 2.8 मिलियन
  7. हरियाणा – मनोहर लाल खट्टर (@mlkhattar) – 1.7 मिलियन
  8. आंध्र प्रदेश – वाय एस जगनमोहन रेड्डी (@ysjagan) – 1.6 मिलियन
  9. राजस्थान- अशोक गहलोत (@ashokgehlot51) – 1.5 मिलियन
  10. तेलंगाना सीएमओ (@TelanganaCMO) – 918.2 हजार

Leave a Comment