देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने या वर्षी मारुती ब्रेझा, मारुकी इग्निस आणि मारुती डिझायर या 3 नवीन कार लाँच केल्या आहेत. याशिवाय कंपनी या वर्षी आणखी 3 नवीन कार लाँच करणार आहे. या कार्सविषयी जाणून घ्या.
लवकरच लाँच होणार मारुती सुझुकीच्या या 3 शानदार कार्स
मारुती सुझुकी एस-क्रॉस –
मारुती सुझुकी या क्रॉसओव्हर एसयूव्हीला पेट्रोल इंजिनसोबत लाँच करणार आहे. एक-क्रॉस पेट्रोलला ऑटो एक्स्पोमध्ये सादर करण्यात आले होते. या एसयूव्हीमध्ये 1.5-लीटर K15B पेट्रोल इंजिन मिळेल, जे सियाज, अर्टिगा आणि विटारा ब्रेझामध्ये देण्यात आलेले आहे. हे इंजिन 105PS पॉवर आणि 138Nm टॉर्क जनरेट करते. अपडेटेड एस-क्रॉस डेल्टा, झेल्टा आणि अल्फा या तीन व्हेरिएंटमध्ये येईल. बीएस-6 एस-क्रॉस पेट्रोल एसयूव्ही जूनच्या अखेर लाँच होण्याची शक्यता असून, याची किंमत जवळपास 9.90 लाख रुपये असेल.
मारुती सुझुकी एस-प्रेसो सीएनजी –
मारुती सुझुकीने एस-प्रेसो सीएनजीला ऑटो-एक्सपोमध्ये सादर केले होते. यात फॅक्ट्री फिटेज सीएनजी किटसोबत BS6-कम्प्लायंट 1.0-लीटर K10B पेट्रोल इंजिन मिळेल. सीएनजी मोडमध्ये हे इंजिन 59.14PS पॉवर आणि पेट्रोल मोडमध्ये 67.98PS पॉवर देईल. यासोबत 5-स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स मिळेल. एस-प्रेसोच्या चारही व्हेरिएंटमध्ये सीएनजी पर्याय मिळण्याची शक्यता आहे. कारच्या डिझाईन आणि फीचरमध्ये जास्त काहीही बदल करण्यात आलेले नाही. पुढील काही महिन्यात एस-प्रेसो सीएनजी लाँच होणार आहे.
मारुती सुझुकी स्विफ्ट फेसलिफ्ट –
मारुती सुझुकी आपली लोकप्रिय कार स्विफ्टचे फेसलिफ्ट मॉडेल लाँच करणार आहे. कंपनीने याआधी जपानमध्ये हे मॉडेल लाँच केले आहे. कारमध्ये नवीन ग्रिल, ग्रिलच्या मध्यभागी क्रोम पट्टी, रिवाइज्ड फ्रंट बंपर आणि नवीन एलॉय व्हिल्ज मिळतील. अपडेटेड स्विफ्टमध्ये सर्वात मोठा बदल याच्या इंजिनमध्ये आहे. यात 1.2-लीटर ड्यूल-जेट पेट्रोल इंजिन मिळेल, जे 91PS पॉवर देते. या वर्षीच्या अखेरपर्यंत भारतीय बाजारात हे मॉडेल लाँच होईल.