महिंद्राने लाँच केली बीएस-6 सुप्रो अ‍ॅम्ब्युलन्स, महाराष्ट्राच्या सेवेत पहिली बॅच

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने आपल्या बीएस6 सुप्रो अ‍ॅम्ब्युलन्सला लाँच केली आहे. कंपनीने या अ‍ॅम्ब्युलन्सला आपल्या लोकप्रिय सुप्रो वॅन प्लॅटफॉर्मवर तयार केले आहे. या अ‍ॅम्ब्युलन्सची मुंबईत एक्स-शोरुम किंमत 6.94 लाख रुपये आहे. महिंद्राने या अ‍ॅम्ब्युलन्सला एलएक्स आणि झेडएक्स या दोन व्हेरिएंटमध्ये लाँच केले आहे. कंपनीने आपल्या अ‍ॅम्ब्युलन्सची पहिली बॅच खास महाराष्ट्र सरकारसाठी बनवली आहे. जेणेकरून कोरोना महामारीशी लढण्यास अ‍ॅम्ब्युलन्सची मदत होईल.

Image Credited – Amarujala

अ‍ॅम्ब्युलन्समध्ये फोल्डेबल स्ट्रेचर आणि ट्रॉली, मेडिकल किट बॉक्स, ऑक्सिजन सिलिंडर, अग्निशामक यंत्र, आग प्रतिरोधक इंटिरिअर आणि घोषणा प्रणाली सारखे फीचर्स आहेत. बाहेरील बाजूस अ‍ॅम्ब्युलन्स एआयएस 125 प्रमाणित रेट्रो रिफ्लेक्टीव्ह डिकेल्स, 75 टक्के फ्रॉस्टेड विंडोज आणि निळा दिवा असलेल्या सायरनने अ‍ॅम्ब्युलन्स सुसज्ज आहेत.

कंपनीने सांगितले की, अ‍ॅम्ब्युलन्सची निर्मिती खास आरोग्य सेवेसाठी करण्यात आली आहे. खासकरून जागतिक महामारीच्या लढण्यासाठी याची निर्मिती करण्यात आली आहे. महिंद्राच्या ऑटोमोटिव्ह डिव्हिजनचे सीईओ विजय नाकरा यांनी सांगितले की, पहिल्या बॅचमध्ये 12 वाहनांना रेकॉर्ड वेळेत उत्पादन करण्यात आले व त्यांची डिलिव्हरी करण्यात आली आहे.

या अ‍ॅम्ब्युलन्समध्ये महिंद्राचे डीआय इंजिन देण्यात आलेले आहे. हे इंजिन 47एचपी पॉवर आणि 100एनएम टॉर्क जनरेट करते. भारतीय रस्त्यांसाठी ही अ‍ॅम्ब्युलन्स उत्तम आहे. ही अ‍ॅम्ब्युलन्स 2 वर्ष अथवा 60 हजार किमी वॉरंटीसह येते.

Leave a Comment