हे 52 चीनी अ‍ॅप्स आहेत धोकादायक, गुप्तचर संस्थेने सरकारला सोपवली यादी

भारतीय गुप्तचर संस्थांनी सरकारला 52 चीनी मोबाईल अ‍ॅपबाबत सावध करत या अ‍ॅप्सला बंद करावे अथवा लोकांना हे अ‍ॅप वापरू नये असे सांगावे असे सांगितले आहे. गुप्तचर संस्थांनुसार हे अ‍ॅप सुरक्षित नसून, याचा मोठा डेटा भारताच्या बाहेर जात आहे. या संदर्भात हिंदूस्तान टाईम्सने वृत्त दिले आहे. या सरकारला पाठवलेल्या अ‍ॅप्सच्या यादीमध्ये झूम, टिक-टॉक, यूसी ब्राउजर, झेंडर, शेअरइट आणि क्लिन मास्टर या लोकप्रिय अ‍ॅप्सचा देखील समावेश आहे.

एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, गुप्तचर संस्थेच्या या प्रस्तावाला राष्ट्रीय सुरक्षा काउंसिल सेक्रेटिएटने देखील पाठिंबा दर्शवला असून, यामुळे भारताच्या सुरक्षेला धोका असल्याचे त्यांन वाटते. प्रस्तावावर सध्या चर्चा सुरू आहे. या प्रत्येक अ‍ॅपची तपासणी केली जाणार आहे.

याआधी एप्रिल महिन्यात सरकारने झूम अ‍ॅप वापरू नये असेही सांगितले होते. या आधी देखील सुरक्षेस धोकादायक असलेल्या अ‍ॅप्सवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र बाईटडान्स सारख्या कंपन्यांनी यास नकार दिला आहे. तर दुसरीकडे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की चीनी चायनीज डेव्हलपर अथवा कंपनीद्वारे लाँच करण्यात आलेले अ‍ॅप्सद्वारे स्पायवेअर अथवा नुकसान पोहचवणारे दुसरे वेअर पसरवले जाऊ शकतात.

गुप्तचर संस्थांनुसार धोकादायक असलेले अ‍ॅप्स –

TikTok, Vault-Hide, Vigo Video, Bigo Live, Weibo, WeChat, SHAREit, UC News, UC Browser, BeautyPlus, Xender, ClubFactory, Helo, LIKE, Kwai, ROMWE, SHEIN, NewsDog, Photo Wonder, APUS Browser, VivaVideo- QU Video Inc, Perfect Corp, CM Browser, Virus Cleaner (Hi Security Lab), Mi Community, DU recorder, YouCam Makeup, Mi Store, 360 Security, DU Battery Saver, DU Browser, DU Cleaner, DU Privacy, Clean Master – Cheetah, CacheClear DU apps studio, Baidu Translate, Baidu Map, Wonder Camera, ES File Explorer, QQ International, QQ Launcher, QQ Security Centre, QQ Player, QQ Music, QQ Mail, QQ NewsFeed, WeSync, SelfieCity, Clash of Kings, Mail Master, Mi Video call-Xiaomi, Parallel Space

 

Leave a Comment