चीनला धडा शिकवणार भारत, 1126 कोटींचा प्रोजेक्ट करणार रद्द

भारत व चीन यांच्यात सीमावादावरून चर्चा सुरू असतानाच लडाखमधील गलवाण खोऱ्यात दोन्ही देशांच्या सैन्यात अचानक संघर्ष झाला. यामध्ये भारताचे 20 जवान हुतात्मा झाले. तर चीनचे जवळपास 43 जवान मारले गेले आहेत. या तणावाच्या पार्श्वभूमीवर आता भारत चीनच्या विरोधात कठोर आर्थिक पावले उचलण्याच्या तयारीत आहे. चीनी कंपन्यांसोबत करण्यात आलेले करार रद्द केले जाऊ शकतात. यामध्ये चीनच्या कंपनीकडे सोपवलेला मेरठ रॅपिड रेल प्रोजेक्ट देखील आहे.

चीनसोबतच्या सीमावादानंतर सरकारने चीनच्या कंपन्यांना दिलेल्या सर्व प्रोजेक्टचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. यात दिल्ली-मेरठ आरआरटीएस प्रोजेक्ट देखील आहे. सरकारकडून यासाठी लागलेली बोली रद्द करण्यासाठी सर्व कायदेशीर बाजू तपासल्या जात आहेत. सरकार चीनी कंपनीकडून या प्रोजेक्ट्ससाठी लावलेली बोली रद्द करू शकते.

दिल्ली-मेरठ येथे सेमी हाय स्पीड रेल्वे कॉरिडोर बनणार आहे. या प्रोजेक्टमुळे दिल्ली गाझियाबादावरून थेट मेरठला जोडली जाईल. 82.15 किमी लांब आरआरटीएसचा 68.03 किमीचा भाग एलिव्हेटेड आणि 14.12 किमी अंडरग्राउंड असेल. प्रोजेक्टच्या अंडरग्राउंड स्ट्रेच बनविण्यासाठी चीनी कंपनी शंघाई टनल इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेडने सर्वात कमी बोली लावली आहे. एसटीईसीने 1126 कोटी रुपयांची बोली लावली होती. आता याला विरोधी पक्षांसह स्वदेशी जागरण मंच विरोध करत आहे.

Leave a Comment