राज्यात आम्ही सत्ताधारी असतो, तर नागपुरात तुकाराम मुंढे आलेच नसते – संदीप जोशी


नागपूर : देशातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात सातत्याने वाढ होत असून या व्हायरसचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. त्यातच आता राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये कोरोनाबाधितांच्या वाढत्या आकड्यांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच आता नागपुरमधील लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यातील संघर्ष पेटला आहे.

दरम्यान नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर महापौर संदीप जोशी यांनी गंभीर आरोप करत शहरातील कोरोनाग्रस्तांच्या वाढीसाठी मनपा प्रशासनच जबाबदार असून शहरात कोरोना रुग्ण क्वॉरंटाईन प्रक्रियेतील घोळामुळेच वाढल्याचे म्हटले आहे. यावेळी जोशी यांनी राज्यात जर आम्ही सत्ताधारी असतो, तर तुकाराम मुंढे नागपुरात आलेच नसते, असेही म्हटले आहे.

संदीप जोशी पुढे म्हणाले, नागपूर शहरातील रुग्णवाढीसाठी मनपा प्रशासनच जबाबदार आहेत. शहरात कोरोना रुग्ण क्वॉरंटाईन प्रक्रियेतील घोळामुळेच वाढले. भाजपला तुकाराम मुंढेंच्या बदलीत स्वारस्य नाही. मुंढेंना ज्यांनी आणले तेच याचे परिणाम भोगत आहेत. आमचे सरकार जर सत्तेत असते, तर मुंढे नागपुरात आलेच नसते.

नागपूरातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात झपाट्याने वाढत आहे. नागपूर शहरात सध्या एकूण कोरोना रुग्णांचा आकडा अकराशेच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. महानगरपालिका प्रशासनाचे यात अपयश आहे. क्वॉरंटाईन करण्याच्या प्रक्रियेत घोळ झाल्यामुळे रुग्ण वाढत असल्याचा आरोप करत नागपूरच्या महापौरांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर थेट निशाना साधला आहे.

तत्पूर्वी काँग्रेसच्या काही नेत्यांनी तक्रार केल्यानंतर, आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीची चर्चा सुरु झाली. पण भाजपला तुकाराम मुंढे यांच्या बदलीत स्वारस्य नाही. मुंढेंना ज्यांनी नागपुरात आणले, तेच लोक आता त्याचे परिणाम भोगत आहेत. आमचा पक्ष सत्तेत असता, तर तुकाराम मुंढे नागपुरात नसते, अशा शब्दात महापौर जोशी यांनी तुकाराम मुंढे यांच्या बदलीच्या चर्चेवर प्रतिक्रिया दिली.

Leave a Comment