व्यापारी महासंघाने मेड इन चायना वस्तूंवर टाकला ‘बहिष्कार’


नवी दिल्ली – संपूर्ण देशाचे पूर्व लडाखमधील गलवाण खोर्‍यात सुरु असलेल्या लष्करी घडामोडींकडे लागलेले असतानाच चीनला व्यापारातून उत्तर देणारा निर्णय अखिल भारतीय व्यापारी महासंघाने (कैट) घेतला आहे. चीन व भारतामध्ये लडाख येथे सुरू असलेल्या सीमावादाच्या पार्श्वभूमीवर चीनमध्ये (मेड इन चायना) तयार केल्या जाणार्‍या 500 वस्तुंवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय कैटने घेतला आहे.

अखिल भारतीय व्यापारी महासंघाने (कैट) प्रत्यक्ष ताबारेषेवर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनमध्ये तयार होणार्‍या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय लष्कराच्या सैनिकांवर गलवाण खोर्‍यात करण्यात आलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ देशभरातील व्यापार्‍यांनी टीका केली. त्याचबरोबर चीन संधी मिळेल तेव्हा भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप देखील या व्यापाऱ्यांनी केला आहे.

चीन वारंवार भारताविरूद्ध भूमिका घेत असल्याचे सांगत चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय व्यापारी महासंघाने घेतला. त्याचबरोबर स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देण्याची भूमिका महासंघाने घेतली आहे. भारतीय सामान-हमारा अभिमान या अभियानातंर्गत मंगळवारी बहिष्कार टाकण्यात येणार्‍या 500 मेड इन चायना वस्तूंची यादी जारी केली आहे. महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया या निर्णयाविषयी बोलताना म्हणाले, सध्या चीनमधून भारतातील वार्षिक आयात 5.25 लाख कोटी रुपयांची आहे.

Leave a Comment