शहीद जवानांबाबत वादग्रस्त ट्विट करणाऱ्या डॉक्टरला सीएसकेने केले निलंबित

लडाख येथील चीनी सैन्यांसोबत झालेल्या संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले. या जवानांविषयी वादग्रस्त ट्विट करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सच्या (सीएसके) टीम डॉक्टरला फ्रेंचाईजीकडून आता निलंबित करण्यात आले आहे. सीएसकेने टीम डॉक्टर मधु थोटापिल्लिल यांचे हे ट्विट दुर्भावनायुक्त असल्याचे म्हटले आहे.

Image Credited – Aajtak

सीएसकेचे टीम डॉक्टर मधु थोटापिल्लिल यांनी या संदर्भात ट्विट केले होते की, उत्सुक आहे की या जवानांच्या शवपेटी त्यावर पीएम केअर्सचे स्टिकर लावून तर परत येणार नाही ?

या वादग्रस्त ट्विटनंतर सीएसकेने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर थोटापिल्लिल यांना निलंबित करण्यात आल्याचे सांगितले. सीएसकेने ट्विट केले की, चेन्नई सुपर किंग्सच्या व्यवस्थापनला डॉ. मधु थोटापिल्लि यांच्या वैयक्तिक ट्विटबद्दल काहीही माहिती नव्हते. त्यांना त्यांच्या डॉक्टर या पदावरून निलंबित करण्यात आले आहे. चेन्नई सुपर किंग्स या ट्विटबाबत खेद व्यक्त केला.

दरम्यान, आयपीएलच्या सुरुवातीपासूनच थोटिपिल्ल हे स्पोर्ट्स मेडिसिन तज्ञ म्हणून चेन्नईच्या संघासोबत आहेत.

Leave a Comment