महासत्ता असलेल्या अमेरिकेत सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती राहतात. हे अब्जाधीश आपली संपत्ती सांभाळण्यासाठी लोक शोधत असतात. सोबत कौटुंबिक ऑफिस देखील चालवत असतात. यासाठी हे अब्जाधीश कोट्यावधी रुपये पगार देऊन प्रोफेशनल्सची नेमणूक करत असतात. येथे म्हटले जाते की अब्जाधीशांचे ऑफिस सांभाळल्याने पैसे तर मिळतातच, सोबतच इतर अब्जाधीशांसोबत देखील ओळख होते.

रिक्रूटमेंट कंपनी एग्रेयूस ग्रुपनुसार, वर्षाला 3 कोटींपेक्षा अधिक पगार घेणारे प्रोफेशनल्स अमेरिकन कौटुंबिक ऑफिससाठी काम करतात. हा रिपोर्ट 671 कौटुंबिक ऑफिसमध्ये काम करणाऱ्या प्रोफेशनल्सशी चर्चा करून तयार करण्यात आला आहे. जगात सध्या 10 हजारांपेक्षा अधिक सिंगल कौटुंबिक ऑफिस आहेत.

अकाउंटिंग फर्म ईवाईनुसार, यातील कमीत कमी अर्ध मागील दोन दशकात सुरु झाले आहेत. यात अल्फाबेटचे एरिक श्मिट आणि मीडिया मुघल जेम्स मर्डोकच्या कौटुंबिक ऑफिसचा देखील समावेश आहे. अशा अब्जाधीशांच्या संपर्कात राहिल्याने भविष्याची चिंता राहत नाही. केवळ ईमानदारीने त्यांचा पैसा, संपत्ती आणि गुंतवणूक सांभाळावी लागते. जगातील 500 सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक चतृतांश अमेरिकेत राहतात. अमेरिकेतील 6 टक्के कौटुंबिक ऑफिसकडे 500 कोटी डॉलरपेक्षा अधिकची संपत्ती आहे.
कोरोना व्हायरसमुळे या कौटुंबिक ऑफिसवर देखील परिणाम झाला आहे. फॅमिली ऑफिस हायरिंग या वर्षीच्या पहिल्या सहामाहीत मागील वर्षीच्या तुलनेत 80 टक्क्यांनी घटले आहे. जुलैपासून यात सुधारणा होऊ शकते.