मर्सिडिज बेंझने आपली थर्ड जनरेशन जीएलएस लग्झरी एसयूव्ही भारतात लाँच केली आहे. कंपनीने या लग्झरी एसयूव्हीची एक्स शोरूम किंमत 99.90 लाख रुपये ठेवली आहे. चाकणच्या प्लांटमध्ये ही एसयूव्ही एसेंबल होईल. ही एसयूव्ही जीएलएस 450 4मॅटिक आणि जीएलएस 400 डी 4मॅटिक या दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होईल.. दोन्हींची किंमत समानच आहे. ही कार भारतात बीएमडब्ल्यू एक्स7 ला टक्कर देईल.
1 कोटींची ‘मर्सिडिज बेंझ जीएलएस’ लग्जरी एसयूव्ही भारतात लाँच

नवीन जीएलएसचा आकार आधीच्या मॉडेलच्या तुलनेत वाढवण्यात आला आहे. नवीन जीएलएस 77एमएम लांब आणि 22एमएम रुंद असण्यासोबतच यात 60एमएम लांब व्हिलबेस देखील देण्यात आले आहे. नवीन जीएलएसला भारतात पेट्रोल आणि डिझेल या दोन इंजिन पर्यायात उपलब्ध करण्यात आले आहे. नवीन जनरेशन मर्सिडिज बेंझ जीएलएस एसयूव्हीमध्ये अधिक स्पेस, अधिक आराम आणि अधिक लग्झरी सुविधा मिळतील. यात मधल्या रांगेत दोन वेगळे आणि आरामदायी सीट्स देखील देण्यात आले आहेत.

कारमध्ये ड्राईव्हर असिस्टेंस सिस्टम देण्यात आले असून, कार लांब व्हिलबेससोबत अधिक जागा असणाऱ्या कॅबिनसह लाँच झाली आहे. एसयूव्हीमध्ये लेटेस्ट जनरेशनचे एमबक्स इंफोटेनमेंट सिस्टम आणि पर्याय म्हणून रियर सीट एंटरटेनमेंट सिस्टम, मागील बाजूला चित्रपट, गाणी पाहण्यासाठी 11.6 इंच डिस्प्ले, 5-झोन क्लायमेट कंट्रोल, नवीन स्टेयरिंग व्हिल डिझाईन आणि इंस्ट्रूमेंट कंसोलसाठी डिजिटल स्क्रीन देण्यात आली आहे. एसयूव्हीसोबत 9 एअरबॅग्स, एक्टिव्ह ब्रेक असिस्ट आणि ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग सारखे फीचर्स देण्यात आलेले आहेत. याशिवाय कारमध्ये हीटेड सीट्स, पॅनोरॅमिक सनरूफ देखील मिळेल.

नवीन जनरेशन जीएलएस एसयूव्हीला पेट्रोल आणि डिझेल इंजिनमध्ये लाँच करण्यात आले आहे. एसयूव्हीमध्ये जीएलएस 580 4 मॅटिक 4.0 लीटर ट्विन टर्बो व्ही8 पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 48 वॉट ऑन-बोर्ड इलेक्ट्रिक सिस्टमसोबत स्टार्टर जनरेटने सुसज्ज आहे. इंजिन 482 बीएचपी आणि 700 एनएम पीक टॉर्क जनरेट करेत. याशिवाय इक्यू बूस्ट तंत्राद्वारे 21 बीएचपी पॉवर आणि 250 एनएम पीक टॉर्क अधिक जनरेट होतो. जीएलएसमधील डिझेल इंजिन जीएलएस 400डी 4मॅटिक 2.9 लीटर इन-लाईन 6 सिलेंडर आयल बर्नर हे आहे. हे इंजिन 326 बीएचपी पॉवर आणि 700 एनएम पीक टॉर्क जनरेट करते.