चीनमध्ये लोकसंख्या नियंत्रणासाठी दशकांपुर्वी एक मूल हे धोरण ठरवण्यात आले आहे. यामुळे तेथील लोकसंख्या नियंत्रणात तर आली मात्र याचे दुष्परिणाम देखील पाहण्यास मिळत आहेत. या दुष्परिणामाबाबत शंघाईच्या फुडान यूनिव्हर्सिटीचे प्रोफेसर ड्यू क्वांग एनजी यांनी सरकारला एक विचित्र सल्ला दिला आहे.
महिलांना दोन पतींसोबत नाते ठेवण्याची परवानगी द्यावी, चीनमधील प्राध्यापकाची अजब मागणी

इकॉनॉमिक्सचे प्रोफेसर एनजी म्हणाले की, चीनमधील महिलांना एकापेक्षा अधिक पतींसोबत नाते ठेवण्याची परवानगी द्यावी. यामुळे एकापेक्षा अधिक मुल जन्माला घालता येतील, असा त्यांचा तर्क आहे. प्रोफेसर क्वांग यांनी एका बिझनेस वेबसाईटवर लिहिलेल्या एका लेखात सरकारला हा सल्ला दिला आहे. त्यांनी आपल्या लेखात म्हटले आहे की जर चीनमध्ये लैंगिक प्रमाण इतके असंतुलित नसते तर मी एकापेक्षा जास्त पती (बहुपुत्री) करण्याची शिफारस केली नसती. केवल लैंगिक प्रमाण समतोल करण्यासाठी असा सल्ला देत असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, चीनमध्ये एक मूल हे धोरण 1980 मध्ये लागू करण्यात आले होते व 2016 मध्ये हटवण्यात आले. या दरम्यान अल्पसंख्यांकावर मुलांच्या संख्येबाबत कोणतेही निर्बंध नव्हते. चीनच्या ग्रामीण भागाला देखील या नियमांपासून वेगळे ठेवण्यात आले होते.
प्रो. क्वांग यांच्यानुसार सध्या चीनमध्ये लिंग प्रमाण 117/100 असे आहे. म्हणजेच 117 पुरुषांमागे 100 महिला आहेत. चीनच्या या लिंग प्रमाणातील असंतुलितपणामुळे येथील युवकांना लग्नासाठी मुली देखील मिळत नाही.