WHOचा इशारा ! दररोज वाढणार 1 लाखांहून अधिक कोरोनाबाधित


न्यूयॉर्क : जगभरातील बहुतांश देशांमध्ये कोरोनाचे थैमान कायम असतानाच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) एक धक्कादायक इशारा दिला आहे. कोरोनाचे थैमान आशिया, दक्षिण अमेरिका आणि मध्य पूर्व देशांमध्ये कायम राहणार असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आले आहे. मागील काही दिवसांमध्ये कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत वेगाने वाढ होत आहे. मागील 15 दिवसांपासून दररोज जवळपास 1 लाखाहून अधिक नवीन रुग्णांना समोर येत आहेत. त्यामुळेच जागतिक आरोग्य संघटनेने पुढील दोन आठवडे अशीच स्थिती कायम राहिल असा इशारा दिला आहे.

याबाबत संघटनेचे प्रमुख टेडरॉस एडहोम यांच्या म्हणण्यानुसार चीनमध्ये 50 दिवसांनंतर पुन्हा एकदा बिकट स्थिती निर्माण झाली आहे. बीजिंगमधील 90 हजार लोकांच्या चाचण्या करण्यात आल्या असून हे प्रकरण चीन चांगल्या पद्धतीने हाताळले असा जागतिक आरोग्य संघटनेला विश्वास आहे. चीनला काही मदत लागल्यास जागतिक आरोग्य संघटनेचे एक पथक तिथे जाणार असल्याची माहिती मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग आफ्रिकेमध्येही वेगाने पसरत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. येत्या दोन आठवड्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होईल, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेकडून देण्यात आला आहे.

Leave a Comment