कोण आहे मॅरी ट्रम्प ?, जी करणार आहे डोनाल्ड ट्रम्प यांची पोलखोल

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची भाची मॅरी ट्रम्प या ट्रम्प यांच्या खाजगी गोष्टींबाबत पुस्तक प्रकाशित करणार आहे. सायमन आणि शूस्टर प्रकाशनाने घोषणा केली की मॅरी ट्रम्प 28 जुलैला ‘टूम मच अँड नेव्हर इनफ : हाऊ माय फॅमिली क्रिएटेड द वर्ल्ड्स मोस्ट डेंजर्स मॅन’ पुस्तकाचे प्रकाशन करणार आहे. हे पुस्तक रिपब्लिकन नॅशनल कंव्हेशनच्या काही आठवड्यांपुर्वी बाजारात येत आहे. यावेळी मॅरी यांचे चुलते म्हणजे डोनाल्ड ट्रम्प हे नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या राष्ट्रपती निवडणुकीसाठी नामांकन दाखल करणार आहेत. अखेर मॅरी ट्रम्प नक्की कोण आहे व आता जगासमोर का येत आहे ? याविषयी जाणून घेऊया.

पुस्तकात नक्की काय ?

कथितरित्या सांगितले जात आहे की पुस्तकात कशाप्रकारे मॅरी यांनी न्यूयॉर्क टाईम्सला ट्रम्प यांच्या वैयक्तिक आर्थिक व्यवहारांबाबत लेख छापण्यासाठी गोपनीय कागदपत्रे दिली होती. पुलित्झर पुरस्काराने सन्मानित मॅरी यांनी आरोप केला आहे की ट्रम्प अनेक फसव्या योजनांमध्ये सहभागी होते आणि वडिलांच्या रिअल इस्टेट व्यवसायामधून आजच्या काळात 400 मिलियन डॉलरपेक्षा जास्त पैसे मिळवले. याशिवाय ट्रम्प यांच्याशी संबंधित असे काही रहस्य समोर येतील, ज्याची सध्या लोकांना माहिती नाही.

ट्रम्प राष्ट्रपती झाल्यानंतर देखील मॅरी ट्रम्प या सर्व गोष्टींपासून लाँबच होती. 20 वर्षांपुर्वी त्यांनी आपल्या भावासोबत मिळून ट्रम्प आणि त्यांच्या भावा-बहिणीवर खटला देखील दाखल केला होता. संपत्तीवरून हा खटला दाखल करण्यात आला होता.

कोण आहे मॅरी ट्रम्प ?

55 वर्षीय मॅरी या डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे भाऊ फ्रेड ट्रम्प ज्यूनियर यांची मुलगी आहे. 1981 मध्ये फ्रेड यांचे 42 व्या वर्षी निधन झाले होते. मॅरी ट्रम्प यांचे पुर्ण नाव मॅरी ली ट्रम्प असून, त्यांचा जन्म मे 1965 मध्ये झाला आहे. सध्या त्या न्यूयॉर्कच्या लाँग आयलँड येथे राहतात. त्यांनी मॅसाच्युसेट्सच्या टफ्ट्स यूनिव्हर्सिटीमधून इंग्रजी साहित्यात पदवी आणि न्यूयॉर्कच्या कोलंबिया यूनिव्हर्सिटीमधून याच विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी न्यूयॉर्कच्या एडेल्फी यूनिव्हर्सिटीमधून क्लिनिकल मानसशास्त्रात पीएचडी केली आहे. डिलीट करण्यात आलेल्या लिंक्डइन प्रोफाईलनुसार त्या एक कोच असून, त्यांनी 2012 मध्ये ट्रम्प कोचिंग ग्रुपची स्थापना केली होती.

Leave a Comment