या देशात लाँच झाली व्हॉट्सअ‍ॅपची पेमेंट सेवा, लवकरच भारतातही होणार सुरू

जगात सर्वाधिक वापरले जाणारे इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपची पेमेंट सर्व्हिस ब्राझीलमध्ये अधिकृतरित्या सुरू आहे. फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्गने एका पोस्टद्वारे याची माहिती दिली आहे. मार्क झुकरबर्गने सांगितले की, आज आम्ही ब्राझीलमध्ये व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट सर्व्हिसची सुरुवात करत आहोत. आम्ही पैसे पाठवणे आणि स्विकारण्याच्या प्रक्रियेला फोटो पाठवण्याऐवढे सोपे बनवत आहोत. लवकरच छोट्या व्यापाऱ्यांना व्हॉट्सअ‍ॅपद्वारे खरेदी-विक्रीची सुविधा देणार आहोत.

Today we're starting to launch payments for people using WhatsApp in Brazil. We're making sending and receiving money as…

Posted by Mark Zuckerberg on Monday, June 15, 2020

झुकरबर्गने सांगितले की, व्हॉट्सअ‍ॅप पेमेंटसाठी ब्राझीलच्या स्थानिक बँकांशी भागीदारी करण्यात आली आहे. व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट सेवा सुरू करण्यात आलेला ब्राझील हा पहिला देश आहे. त्यांनी भारतासह इतर देशांमध्ये देखील ही सेवा लवकरच सुरू करणार असल्याचे सांगितले आहे.

Leave a Comment