81 लाखांच्या पार पोहोचली जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या


नवी दिल्ली – जीवघेण्या कोरोनाने जगभरात थैमान घातले असून या व्हायरससमोर संपूर्ण जग हतबल झाले आहे. त्यातच जगभरातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात वेगाने वाढ होत आहे. आता 81 लाखांच्या पार जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या पोहोचली आहे. तर या व्हायरसने आतापर्यंत सव्वा चार लाखांहून अधिक लोकांचा जीव घेतला आहे.

यासंदर्भात वर्ल्डोमीटरने दिलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत जगभरात 81 लाख 08 हजार 666 लोकांना कोरोनाची लागण झाली असून यापैकी 4 लाख 38 हजार 596 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 41 लाख 96 हजार 614 लोक उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. जगभरात जवळपास 62 टक्के कोरोनाचे रुग्ण फक्त 8 देशांमध्ये आहेत. या देशांमध्ये कोरोना बाधितांची संख्या 50 लाखांहून अधिक आहे.

अमेरिकेमध्ये कोरोनाचा सर्वाधिक कहर दिसून येत आहे. जवळपास 22 लाख लोकांना अमेरिकेमध्ये आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. एक लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. पण, अमेरिकेपेक्षा जास्त कहर सध्या ब्राझीलमध्ये दिसून येत आहे. ब्राझीलनंतर रूस आणि भारतामध्ये पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे.

ब्राझील, रूस, स्पेन, यूके, इटली, भारत, पेरू या देशांमध्ये कोरोना बाधितांची संख्या दोन लाखांच्या पार पोहोचली आहे. याव्यतिरिक्त आठ देश असे आहेत, जिथे एक लाखांहून अधिक कोरोना बाधित रुग्ण आहेत. चार देश (अमेरिका, ब्राझील, ब्रिटन, इटली) असे आहेत, जिथे 30 हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेमध्ये मृतांचा आकडा 1.18 लाखांच्या पार पोहोचला आहे.

Leave a Comment