बबिता फोगट संतापली; करणच्या बापाची जहागीर आहे का ही इंडस्ट्री?


१४ जून रोजी आपल्या वांद्रे येथील राहत्या घरात अभिनेता सुशांत सिंह राजपूतने गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी दुपारी विलेपार्ले येथील पवनहंस स्मशानभूमीत सुशांतच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पण सुशांतची अशी अचानक एक्झिट सगळ्यांनाच चटका लावणारी होती. सुशांतच्या निधनानंतर अनेक कलाकार सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत. अशातच करण जोहरवर भारताची महिला कुस्तीपटू बबिता फोगटने ट्विट करत निशाणा साधला आहे.


ट्विटरच्या माध्यमातून बबिताने संताप व्यक्त केला आहे. कोण आहे हा करण जोहर? त्याने इंडस्ट्रीमध्ये काय कचरा पसरवला आहे. ही फिल्म इंडस्ट्री त्याच्या मालकीची नाही. त्याला कुणीच कसे सडेतोड उत्तर का देत नाही? या सर्वाला एक माझी बहिण कंगना एकटी उत्तर देते. करण आणि त्याच्या गँगच्या सर्व चित्रपटांवर बहिष्कार टाकण्यात यावा, तिने ट्विटमध्ये म्हटले आहे.


तत्पूर्वी इन्स्टाग्रामवर अभिनेत्री कंगना राणावतने व्हिडीओ शेअर करत सुशांतने आत्महत्या केली नव्हती तर त्याचा खून झाला असल्याचे धक्कादायक व्यक्तव्य केले होते. आता कंगनाच्या वक्तव्याचे समर्थन करत बबिताने एक ट्विट केले आहे. बहिण कंगना राणावतचे बोलणे मला योग्य वाटते. छोट्या शहरातून जे लोके येतात त्या लोकांसोबत भेदभाव केला जातो, जे नाही झाले पाहिजे, असे बबिताने आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Leave a Comment