छिछोरेनंतर 6 महिन्यातच का गेले सुशांतच्या हातातून 7 चित्रपट– संजय निरुपम

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनाने अनेकांना धक्का बसला आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी यावर प्रतिक्रिया देत आहे. अनेकजण बॉलिवूडमधील घराणेशाही आणि इंडस्ट्रीच्या कार्यशैलीवर टीका करत आहेत. यातच आता काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी ट्विटर करत प्रश्न विचारला की, छिछोरे हिट झाल्यानंतर मागील 6 महिन्यात सुशांतच्या हातातून 7 चित्रपट का गेले ?

संजय निरुपम यांनी ट्विट केले की, छिछोरे हिट झाल्यानंतर सुशांतने 7 चित्रपट साईन केल्या होत्या. 6 महिन्यात त्याच्या हातातून सर्व गेल्या. का ? फिल्म इंडस्ट्रीमधील निर्दयता एक वेगळ्या पातळीवर काम करते. या निर्दयतेपणानेच एका प्रतिभावान कलाकाराला मारले.

दरम्यान, सुशांत मागील सहा महिन्यांपासून डिप्रेशनमध्ये होता. तो यावर उपचार देखील होता. संजय निरुपम यांच्या प्रमाणेच शेखर कपूर, निखिल द्विवेदी, रणवीर शौरी आणि दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी देखील बॉलिवूडमध्ये काही पॉवरहाऊसच सत्ता चालवत असल्याचे म्हणत निशाणा साधला आहे.

Leave a Comment