सुशांतच्या बाबतीत ट्विट केल्यामुळे सोनम कपूर होत आहे ट्रोल


रविवारी आपल्या वांद्र्यातील राहत्या अभिनेता सुशांत सिंह राजपूतने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतच्या अचानक एक्झिटमुळे सिनेसृष्टीसर सर्वच क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. सुशांतला बॉलिवूडसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली. पण यातच आपल्या एका ट्विटमुळे अभिनेत्री सोनम कपूरला टीकेचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर तिला ट्रोल करत नेटकऱ्यांनी ज्ञान वाढवण्याचा सल्लाही दिला.


नैराश्येतून सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे. त्याच्यावर मागील पाच ते सहा महिन्यांपासून उपचार सुरु होते. शिवाय त्याची कथित गर्लफ्रेण्ड रिया चक्रवर्तीसोबतचे नाते बिघडल्यामुळे त्याने आत्महत्येचे पाऊल उचलले का अशीही चर्चा सुरु आहे. तोच धागा पकडून सोनम कपूरने ट्विट केले आहे.

सोनम कपूरने आपल्या ट्विटमध्ये एखाद्याच्या मृत्यूसाठी त्याची गर्लफ्रेण्ड, एक्स गर्लफ्रेण्ड, कुटुंब, सहकाऱ्यांना दोष देणे अज्ञान असल्याचे म्हटल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला चांगलेच फैलावर घेतले. कोण आहे सोनम कपूर? सुशांतपेक्षा जास्त स्ट्रगल तिने केला होता का? ही तीच मुलगी आहे की जिने टॅलेण्टेड ऐश्वर्याला आंटी म्हटले होते? बिघडलेली मुलगी. हिला मुख्य मुद्दा माहित नाही आणि ज्ञानही नाही आणि तोंडपाठ केलेले ज्ञान वाटायला आली, असे म्हणत नेटकऱ्यांनी सोनमची अक्कल काढली. त्याचबरोबर अनेकांनी नेपोटिझमवरुनही ट्विट केले आहेत.

Leave a Comment