लडाखमध्ये शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या बलिदानाचा बदला घ्या – असदुद्दिन ओवेसी


हैदराबाद – एआयएमआयएमचे प्रमुख आणि लोकसभेतील खासदार यांनी पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात चीन सैन्यासोबत झालेल्या हिंसक झडपीत शहीद झालेल्या तीन सैनिकांच्या पाठिशी संपूर्ण भारत उभा असून शहीद झालेले कर्नल आणि दोन वीर जवानांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आपण सहभागी असल्याचे ट्विटमध्ये केला आहे. त्याचबरोबर स्वत: पुढे राहून कमांडिंग ऑफिसर नेतृत्व करत होते. या शहीद जवानांचे बलिदान वाया जाता कामा नये, चीनच्या या कृतीचा बदला सरकारने घेतला पाहिजे, असे ओवेसी यांनी म्हटले आहे.


दोन्ही देशांच्या सैन्य अधिकाऱ्यांमध्ये मागच्या काही दिवसात झालेल्या चर्चेनुसार गलवान खोऱ्यातील पेट्रोलिंग पॉईंट १४,१५ आणि १७ ए मधून चिनी सैन्य मागे हटेल असे ठरले होते. त्यानुसार चीनी लष्कर मागे सरकत देखील होते. पण त्यांनी तेथील ताबा पूर्णपणे सोडला नव्हता. चिनी सैन्य पूर्णपणे माघारी फिरेल असा निर्णय काल झाला होता. दोन्ही देशांच्या सैन्य अधिकाऱ्यांमध्ये ठरल्यानंतरही चिनी सैन्याने मागे फिरण्यास नकार दिल्यानंतर ही हिंसक झडप झाली.

Leave a Comment