तुम्ही पाहिला का पोलिसांच्या ट्रेनिंगचा हा मजेशीर व्हिडीओ ? - Majha Paper

तुम्ही पाहिला का पोलिसांच्या ट्रेनिंगचा हा मजेशीर व्हिडीओ ?

जवानांच्या कठोर ट्रेनिंगबाबत तुम्ही अनेकदा ऐकले असेल. सोशल मीडियावर असाचा एक पोलिसांच्या ट्रेनिंगचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. मात्र यात प्रशिक्षक कठोर ट्रेनिंगला देखील कसे मजेशीर बनू शकतात हे या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

उत्तर प्रदेशचे पोलीस अधिकारी राहुल श्रीवास्तव यांना हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत त्यांनी लिहिले की, यूनिफॉर्म घालणारे कदाचितच प्रशिक्षण देणाऱ्या आउटडोर प्रशिक्षकालाला विसरू शकतील व अशा प्रशिक्षकाला कोण विसरू शकेल जे परेडला देखील संगीतमय बनवतात. भेटा तेलंगाना पोलीस दलातील प्रशिक्षक मोहम्मद रफींशी, ज्यांच्या सुर तालावर सर्व जवान थिरकत आहे.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की प्रशिक्षक अगदी तालात मजेशीररित्या ट्रेनिंग देत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर हसू आल्याशिवाय राहणार नाही. आतापर्यंत या व्हिडीओला 2 हजारांपेक्षा अधिक जणांनी बघितले असून, अनेकांनी यावर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.

Leave a Comment