कोरोना संकटात पीएफ खात्यातून पैसे काढायचे आहेत, जाणून घ्या नियम

लॉकडाऊनच्या काळात नोकरी जाणे, कंपनीकडून पगार कपात या सारख्या गोष्टींमुळे अनेक लोकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अशा स्थितीमध्ये तुम्ही प्रोव्हिडेंट फंड खात्यामधून पैसे काढू शकता. केंद्र सरकारने सूचना जारी करत कोरोना संकटाच्या काळात ईपीएफ खातेधारकांना नॉन-रिफंडेबल अ‍ॅडवाँस काढण्याचा पर्याय दिला आहे.

किती पैसे काढू शकता ?

ईपीएफ खातेधारक या काळात ईपीएफ खात्यातून 3 महिन्यांचे मूळ वेतन आणि महागाई भत्त्या अथवा एकूण रक्कमेच्या 75 टक्के रक्कम, जी कमी असेल, ते काढू शकतात. तुम्ही ईपीएफओ पोर्टलवर पीएफ विड्रॉलसाठी क्लेम करू शकता. तुमची आधीचीच अग्रिम रक्कम पेंडिंग असली तरी देखील तुम्ही क्लेम करू शकता.

पात्रता –

अ‍ॅडवाँस रक्कमेसाठी क्लेम करण्यासाठी तुमचा यूनिव्हर्सल अकाउंट नंबर (यूएएन) सुरू असणे गरजेचे आहे. तुमचा आधार नंबर यूएएनशी लिंक असावा. तुमचे बँक खाते आणि आयएफएससी कोड देखील यूएएनशी लिंक असावे.

कसा कराल क्लेम ?

  • क्लेम करण्यासाठी ईपीएफओच्या पोर्टलवरील https://unifiedportalmem.epfindia.gov.in/memberinterface या मेंबर इंटरफेसवर जा.
  • ऑनलाईन सर्व्हिसेजवर जाऊन क्लेमवर क्लिक करा (फॉर्म-31, 19, 10सी आणि 10डी).
  • यानंतर ‘Proceed for Online Claim’ वर क्लिक करा.
  • ड्रॉप डाउन मेन्यूमधील PF Advance (Form 31) हा पर्याय निवडा.
  • यानंतर पुढे ‘Outbreak of pandemic (COVID-19)’ हा पर्याय निवडा.
  • ‘Get Aadhaar OTP’ वर क्लिक करा.
  • आधारशी लिंक मोबाईल नंबरवर तुम्हाला ओटीपी येईल.
  • ओटीपी टाकल्यानंतर तुमचा क्लेम सबमिट होईल.

क्लेमचे स्टेट्स चेक करा –

तुम्ही तुमच्या क्लेमचे स्टेट्स देखील चेक करू शकता. यासाठी तुम्हाला मेंबर ई-सेवा पोर्टलवर अकाउंटद्वारे लॉग इन करावे लागेल. येथे ऑनलाईन सर्व्हिसेवर जाऊन ‘Track Claim Status’ वर क्लिक केल्यानंतर स्टेट्स तपासू शकता.

Leave a Comment