लाईव्ह टिव्हीवर बातम्या वाचण्याऐवजी चक्क ज्यूस विकू लागले पाकिस्तानी न्यूज अँकर, नेटकऱ्यांनी केले ट्रोल

पाकिस्तानमध्ये एका न्यूज बुलेटिन दरम्यान असे काही घडले की जे पाहून सर्वचजण हैराण झाले आहेत. पाकिस्तानमधील टिव्ही न्यूज अँकर हातात चक्क ज्यूस पॅक घेऊन त्याचे ब्रँडिंग करू लागले, हे पाहून लोक देखील हैराण झाले.  या न्यूज बुलेटिनची क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही लोक अशाप्रकारचे ब्रँडिंगची टीका करत आहेत, तर भारतीय युजर्सला त्यांना ट्रोल करत आहेत. या व्हिडीओला पाकिस्तानी पत्रकार नायला इनायतने सोशल मीडियावर शेअर केले आहे.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, पाकिस्तानी न्यूज चॅनेल अबतक न्यूजचे दोन अँकर लाईव्ह टिव्ही दरम्यान बातम्या सांगण्याऐवजी चक्क ज्यूसला प्रमोट करत आहेत. अँकर ज्यूस पिताना लोकांना ते खरेदी करत मोबाईल डेटा जिंकण्याच्या ऑफरविषयी सांगत आहेत.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांना या अँकर्सची खिल्ली उडवली. काहींना कमी बजेटमध्ये उत्पादन बाजारात आणण्याचा चांगला पर्याय आहे असे म्हटले तर काही जणांना त्यांना ट्रोल केले. ट्विटरवर या व्हिडीओला आतापर्यंत 80 हजारांपेक्षा अधिक युजर्सनी पाहिले आहे.

Leave a Comment