मुंबईतील कोरोना परिस्थितीवरुन नितीन गडकरी यांचे मोठे वक्तव्य - Majha Paper

मुंबईतील कोरोना परिस्थितीवरुन नितीन गडकरी यांचे मोठे वक्तव्य


नवी दिल्ली – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सध्याच्या घडीला मुंबईत येण्याची हिंमत माझ्यात नसल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्रात देशातील सर्वात जास्त कोरोनाबाधित रुग्ण असून महाराष्ट्र कोरोनाबाधित राज्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्यातही महाराष्ट्रात मुंबई एक मुख्य हॉटस्पॉट आहे. मुंबईतील एकूण बाधितांची संख्या ५९ हजार २०१ वर गेली आहे. तर मृतांची संख्या २२४८ वर गेली आहे.


मुंबईतील सध्याची परिस्थिती पाहता मुंबईत येण्याची हिंमत माझ्यात नाही. पण ही परिस्थिती नक्की बदलेल मला असा विश्वास असल्याचे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. कोरोनानंतर लघु उद्योग तसेच पायाभूत सुविधा कशा पद्दतीने विकासाचा पाया रचण्यात महत्त्वाची भूमिक निभाऊ शकतात यावर आयोजित कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते.

Leave a Comment