सुशांतच्या आत्महत्येच्या वृत्ताने धोनीला बसला मोठा धक्का – नीरज पांडे

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येने सर्वचजण हैराण झाले आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीला देखील याचा मोठा धक्का बसला आहे. सुशांतने 2016 साली आलेल्या धोनीच्या बायोपिक ‘एमएस धोनी : दी अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी सुशांतने किरण मोरे यांच्याकडून 9 महिने प्रशिक्षण देखील घेतले होते. धोनीप्रमाणे शॉट मारणे, त्याच्या प्रमाणे हावभाव या गोष्टी शिकण्यात सुशांतने खूप मेहनत केली होती.

धोनीचे एजेंट आणि बायोपिकचे निर्माते अरुण पांडे यांनी सांगितले की, ही भूमिका एवढ्या चांगल्यारितीने साकरण्याचे कारण होते की चित्रपटाचा भाग होण्याआधीच त्याने धोनीला पुर्णपणे ओळखले होते. धोनी त्याच्यासाठी एक प्रेरणा होता. सुशांत इंडस्ट्रीमधून नव्हता. तो देखील धोनीप्रमाणेच एका छोट्याशा शहरातून आला होता.

दिग्दर्शक नीरज पांडे यांनी सुशांतच्या निधनाबाबत माहिती देण्यासाठी धोनीला फोन देखील केला होता. त्यांनी सांगितले की, माहीला फोन करण्यासोबतच त्याच्या सर्वात जवळील मित्र मिहिर दिवाकर आणि अरुण पांडेला देखील बोलवले. त्या सर्वांना धक्का बसला आहे. ही बातमी समजल्यावर माहीला देखील मोठा धक्का बसला असून, तो आतून उद्धवस्त झाला आहे.

Leave a Comment