मोटोरोला कंपनी आपला नवीन स्मार्टफोन मोटोरोला वन फ्युजन+ भारतात लाँच केला आहे. या फोनमध्ये कंपनीने पॉप-अप सेल्फी कॅमेरा दिला आहे. पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्यासह येणारा हा कंपनीचा दुसार स्मार्टफोन आहे. मोटोरोला वन फ्युजन+ भारतात 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला असून, याची किंमत 16,999 रुपये आहे. हा फोन ट्विलाइट ब्लू आणि मूनलाइट व्हाइट या रंगात मिळेल. 24 जूनपासून फ्लिपकार्टवर 12 वाजल्यापासून याची विक्री सुरू होईल.
दमदार फीचर्स असणारा ‘मोटोरोला वन फ्युजन+’ स्मार्टफोन लाँच

ड्युल सिम सपोर्ट असणारा हा स्मार्टफोन अँड्राईड 10 वर चालतो. यात 6.5 इंच फूल एचडी+ (1,080×2,340 पिक्सल) नॉट-लेस डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये Adreno 618 जीपीयूसोबत स्नॅपड्रॅग्न 730G प्रोसेसर मिळेल. इंटर्नल मेमरी कार्डच्या मदतीने 1टीबीपर्यंत वाढवता येईल.

कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर यात रियरला क्वॉड कॅमेरा सेटअप देण्यात आलेला आहे. याचा प्रायमेरी कॅमेरा 64 मेगापिक्सल आहे. सेकेंडरी कॅमेरा 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल असून, 5 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा देखील यात मिळेल. सेल्फीसाठी यात फ्रंटला 16 मेगापिक्सलचा पॉप-अप कॅमेरा मिळेल.

या फोनमध्ये रियरला फिंगरप्रिंट सेंसर देखील आहे. फोनमध्ये 15 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000 एमएएच बॅटरी देण्यात आलेली आहे.