‘सुशांतला एक उत्तम कलाकार म्हणून लक्षात ठेवा’, मनोज बाजपेयी आणि शेखर कपूर यांनी लोकांना केले आवाहन

अभिनेता मनोज बाजपेयी आणि फिल्ममेकर शेखर कपूर यांनी इंस्टाग्राम लाईव्ह दरम्यान सुशांत सिंह राजपूतला भावनिक श्रद्धांजली वाहिली. 1 तासांपेक्षा अधिक वेळ चाललेल्या या लाईव्हमध्ये दोघांनीही सुशांतबद्दलच्या आठवणी सांगत लोकांना नकारात्मक गोष्टी न पसरवण्याचे आवाहन केले आहे. सुशांतने ‘सोनचिडिया’ या चित्रपटात बाजपेयीसोबत काम केले होते. तर तो शेखर कपूर यांच्या ‘पाणी’ या आगामी चित्रपटात दिसणार होता. मात्र ते शक्य झाले नाही.

इंस्टाग्राम लाईव्ह दरम्यान मनोज बाजपेयीने सांगितले की, मी तो क्षण विसरू शकत नाही जेव्हा तो मला पहिल्या दिवशी भेटला आणि तो अचानक माझ्या पाया पडले होते. तो सांगायचा, सर मी सुध्दा बिहारचाच आहे. त्याला काही सल्ला दिल्यास, तो ते मान्य देखील करत असे. तो सेटवर टेलिस्कोप घेऊन येत असे. सर्वांना त्यातून पाहण्यासाठी एखाद्या लहान बाळाप्रमाणे बोलवत असे. तो कोपऱ्यात बसून मनातच सराव करायचा. आम्ही ज्योतिष, खगोलशास्त्र, क्वांटम भौतिकशास्त्र, लोक, नातेसंबंध आणि मानवी संघर्ष अशा विविध गोष्टींविषयी बोलायचो.

शेखर कपूर यांनी सांगितले की, जेव्हा मी त्याला पहिल्यांदा भेटलो तेव्हा तो एखाद्या लहान मुलाप्रमाणे उड्या मारत होता. माझ्यासोबत पाणी चित्रपटात काम करण्यासाठी तो खूप उत्सुक होता. तो कामाच्या प्रत्येक ठिकाणी असे. रात्रीच्या तीन वाजता कॉल करून तो मला गोरा (पात्र) सापडत नाही, असे सांगे. छोट्या छोट्या गोष्टींविषयी तो खूप सजग होता. यासाठी त्याने वजन देखील कमी केले होते. मला हा मुलगा खूप आवडू लागला होता.

फिल्म इंडस्ट्रीमधील घराणेशाही विषयी बाजपेयी म्हणाले की, मला स्टार सिस्टमचा तिरस्कार आहे. बिहारमधून एखाद्या साध्या कुटुंबातून येऊन तो शिखरावर पोहचला होता. तो इतरांप्रमाणेच सर्वोत्तम होता, उलट त्यांच्यापेक्षा अधिक चांगला होता. मला त्याच्या प्रवासाचा गर्व वाटतो. कपूर यांनी सांगितले की, निर्मात्याने सुशांतसोबत पाणी चित्रपट करण्यास नकार दिला. त्यामुळे रागात मी बाहेरच्या दिशात आलो. आता मला वाटते मी त्याच्यासोबत दुसरे चित्रपट करायला हवे होते. मी त्याला लवकर फोन करायला हवा होता. त्यासोबत कनेक्ट राहण्यासाठी थोडे प्रयत्न करायला हवे होते.

दोघांनीही चाहत्यांना सुशांतला माणूस म्हणून आणि एक कलाकार म्हणून कायम स्मरणात ठेवण्याचे आवाहन केले.

Leave a Comment