कौतुकास्पद : उंची कमी मात्र आत्मविश्वास भरपूर, हे झाले भारतीय सैन्यात अधिकारी

भारतीय सैन्यात दाखल होण्याचे स्वप्न अनेक तरुणांचे असते. मात्र प्रत्येकालाच यात यश मिळते असे नाही. नुकतीच भारतीय सैन्य अकादमीची पासिंग आऊट परेड पार पडली. अनेक तरुण भारतीय सैन्याच्या वेगवेगळ्या रेजिमेंट्सचे अधिकारी झाले. यातीलच एक नाव लाल्हमच्छुआना हे आहे. त्यांची उंची खूपच कमी असली तरी आत्मविश्वास मात्र भरपूर आहे. मिझोरमचे मुख्यमंत्री जोरामगांथा यांनी त्यांचे कौतुक करणारे ट्विट करत त्याच्याबद्दलची माहिती शेअर केली.

त्यांनी फोटो शेअर करत लिहिले की, मिझोरमला स्वतःच्या लेफ्टनंट लाल्हमच्छुआना वर गर्व आहे. जे उत्तर रामहलुन येथे राहणाऱ्या लालसांगवेला यांचे पुत्र आहेत. त्यांना भारतीय सैन्याच्या प्रतिष्ठित आर्टिलरी रेजिमेंटमध्ये अधिकारी बनवण्यात आले आहे.

लेफ्टनंट लाल्हमच्छुआना यांची उंची खूपच कमी आहे. मात्र या सर्व गोष्टींवर त्याने मात्र करत हे यश मिळवले आहे. त्यांचे हे यश नक्कीच इतर युवकांना प्रेरणा देईल. एका रिपोर्टनुसार लाल्हमच्छुआना हे एसटी श्रेणीमधून येतात. भारतीय सैन्य दलात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या अधिकाऱ्याची उंची कमीत कमी 157 सेमी असणे गरजेचे आहे. मात्र या प्रकरणात ईशान्य, आसामी, गोरखा आणि इतर आदिवासींना यात सुट सूट आहे. या श्रेणीतील उमेदवारांसाठी किमान उंची 152 सें.मी. आवश्यक आहे.

Leave a Comment