चिनी कंपनी ग्रेट वॉल मोटर्स करणार महाराष्ट्रात 7600 कोटींची गुंतवणूक

चीनी कार उत्पादन कंपनी ग्रेट वॉल मोटर्सने भारतात पाऊल ठेवले असून, कंपनीने महाराष्ट्रातील तळेगाव येथे उत्पादन प्लांट सुरू करण्यासाठी राज्य सरकारसोबत सामंजस्य करार (एमओयू) केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि चीनचे अँबेसेडर सून विंईडोग यांच्या उपस्थितीमध्ये एमओयूवर सही करण्यात आली. कंपनी तळेगावच्या या प्लांटमध्ये सुरूवातीच्या टप्प्या 1 बिलियन डॉलरची (7600 कोटी रुपये) गुंतवणूक करणार आहे व प्लांटमध्ये अत्याधुनिक तंत्र असेल. हे उत्पादन प्लांट आणि बंगळुरू येथील आर अँड डी सेंटर जवळपास 3 हजार लोकांना रोजगार देईल.

व्हर्च्युअल मिटिंगद्वारे एमओयूवर सही करण्यात आली. यावेळी ग्रेट वॉल मोटर्सची भारतीय यूनिटचे अध्यक्ष जेम्स यांग, मॅनेजिंग डायरेक्टर पार्कर शी, चीनचे राजदूत सन विंईडोग, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित होते. यावेळी पार्कर शी म्हणाले की, तळेगावमध्ये बनणारा हा प्लांट आधुनिक रोबोटिक्स तंत्रज्ञानावर काम करेल. ज्यामुळे उत्पादन सोपे होईल. टप्प्याटप्प्याने भारतात कंपनी 1 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. याद्वारे 3 हजार जणांना रोजगार मिळेल.

दरम्यान, या प्लांटचे अधिग्रहण करण्यासाठी कंपनीने जानेवारी महिन्यातच करार केला होता.

Leave a Comment