सुशांतच्या कुटुंबियांचे एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेकडून सांत्वन

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. सर्वच क्षेत्रातील व्यक्तीने त्याला सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहिली. मात्र त्याची एक्स-गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने काहीही प्रतिक्रिया अथवा सोशल मीडियावर पोस्ट न केल्याने चर्चा सुरू झाली होती.

Image Credited – ABPlive

आज अखेर अंकिताला सुशांतच्या बांद्रा येथील घरी त्याच्या कुटुंबाची भेट घेतली. तिने आई व दिग्दर्शक संदीप सिंह यांच्यासोबत सुशांतच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांना आधार दिला.

Image Credited – ABPlive

अंकिता आणि सुशांत हे दीर्घकाळ सोबत होते. मात्र 2016 मध्ये त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. पवित्र रिश्ता कार्यक्रमातील अंकिताची सह-कलाकार प्रार्थना बेहरे हिने सांगितले की, सुशांतच्या निधनाच्या बातमीने अंकिताला मोठा धक्का बसला आहे.

Image Credited – Bollywood Life

अंकिताचे सुशांतच्या कुटुंबाला दिलेल्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Leave a Comment