येत्या महिन्याभरात 8 लाखांपर्यंत वाढू शकते कोरोनाग्रस्तांची संख्या- स्टडी

भारतात लॉकडाऊनच्या नियमांमध्ये सूट देण्यात आल्यानंतर कोरोनाग्रस्तांचा आकडा दुप्पट वेगाने वाढत आहे. कोरोनाग्रस्तांचा हा आकडा 15 जुलैपर्यंत 8 लाखांपर्यंत पोहचू शकतो, असा दावा एका अभ्यासात करण्यात आलेला आहे. मिशिगन यूनिव्हर्सिटीच्या डेटा सायंटिस्टने हा स्टडी केला असून, येणाऱ्या काळात भारत ब्राझीलनंतर जगातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त असलेला देश असेल असे म्हटले आहे.

या टीममधील प्रोफेसर भ्रमर मुखर्जी म्हणाल्या की, सध्या भारतात कोरोनाग्रस्तांचा सर्वोच्च स्तर पाहणार नाही, कारण हा काही काळासाठी पुढे ढकलला गेला आहे. पुढील काही महिन्यात स्थिती अधिक बिकट होणार आहे. लॉकडाऊनच्या नियमांमध्ये सूट दिल्यानंतर दररोज कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात जवळपास 10 हजाराने वाढ होत चालली आहे. सध्या भारत कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारी अमेरिका, ब्राझील आणि रशिया या तीन देशांच्या मागे आहे.

लॉकडाऊन करणे आर्थिक दृष्ट्या महागात पडत आहे, तर नियमांमध्ये सूट दिल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. अशा स्थिती प्रत्येकाने सोशल डिस्टेंसिंग पाळणे गरजेचे आहे. भ्रमर मुखर्जी म्हणाल्या की, पुढील काही महिन्यात देशभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा झपाट्याने वाढेल. लॉकडाऊनमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा कमी होत नाही आहे, मात्र अर्थव्यवस्थेची नुकसान होत असल्याने भारताला दोन्ही संकटाचा सामना करावा लागत आहे.

Leave a Comment