सुशांत सिंह राजपूतला जॉन सीनाने वाहिली श्रद्धांजली


राहत्या घरात गळफास घेऊन अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या केल्यानंतर सर्वच क्षेत्रात त्यांच्या निधनाच्या वृत्तामुळे खळबळ उडाली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला सेलिब्रिटींपासून ते क्रीडाविश्वातील अनेकांनी श्रद्धांजली वाहिली आहे. अनेक दिग्गजांचा यात समावेश असून सुशांत सिंह राजपूतला डब्ल्यूडब्ल्यूई सुपरस्टार जॉन सीनानेही श्रद्धांजली वाहिली आहे.


आपल्या इन्स्टाग्रामवर डब्ल्यूडब्ल्यूई सुपरस्टार जॉन सीनाने सुशांत सिंह राजपूतचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोला त्याने कोणतीही कॅप्शन दिलेली नाही. पण तरी या पोस्टकडे अनेकांचे लक्ष वेधले आहे. कोणत्याही भारतीय कलाकारांशी किंवा क्रीडाविश्वातील व्यक्तींशी जॉन सीनाची फारशी ओळख नाही. पण तो तरीदेखील अनेक वेळा मनोरंजन विश्वासंदर्भात फोटो पोस्ट करताना दिसतो. त्याने यापूर्वी बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेता ऋषी कपूर यांचाही फोटो पोस्ट करुन त्यांना आदरांजली वाहिली होती. गेल्या वर्षी देखील सप्टेंबर महिन्यात जॉनने सुशांतचा एक फोटो शेअर केला होता.

Leave a Comment