महिलेने साडीमध्ये केला असा स्टंट, नेटिझन्सने केले कौतुक

सोशल मीडियावर वेगवेगळे स्टंटचे व्हिडीओ दररोज व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यातील खास गोष्ट म्हणजे महिलेने चक्क साडी घालून स्टंट केला आहे. सर्वसाधारणपणे साडी घालून कोणताही स्टंट करणे शक्य नसते. मात्र महिलेने चक्क बॅक फ्लिप मारली आहे.

या व्हिडीओला ट्विटर यूजर @VarierSangitha या युजरने शेअर केले आहे. व्हिडीओ शेअर युजरने लिहिले की, ना बूट, ना योग्य जागा आणि तेही साडीत. बघा किती सुंदर पद्धतीने ती हातावर लँड झाली.

महिलेचा हा बॅक फ्लिप मारतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला 3 लाखांपेक्षा अधिक युजर्सनी पाहिले आहे. तर शेकडो युजर्सनी कमेंट करत महिलेच्या या स्टंटला दाद दिली आहे.

Leave a Comment