बाईटडान्स करणार 'विगो' अ‍ॅप बंद, युजर्सचे होणार टीक-टॉकवर स्थलांतर - Majha Paper

बाईटडान्स करणार ‘विगो’ अ‍ॅप बंद, युजर्सचे होणार टीक-टॉकवर स्थलांतर

टीक-टॉकची पॅरेंट कंपनी बाइटडान्स डिसेंबर महिन्यात आपले शॉर्ट व्हिडीओ अ‍ॅप विगो व्हिडीओ आणि विगो लाईट बंद करणार आहे. कंपनीने या अ‍ॅप्सच्या युजर्सला टीक-टॉक डाऊनलोड करण्यास सांगितले आहे. टीक-टॉकप्रमाणेच इंटरफेस असणारे हे दोन्ही शॉर्ट व्हिडीओ शेअरिंग अ‍ॅप आहेत. यात 15 सेंकदाचे व्हिडीओ पोस्ट करता येतात.

कंपनीने सांगितले की, 31 ऑक्टोबरपासून हे अ‍ॅप्स बंद करणार आहे. सोबतच कंपनी युजर्सला आपले अकाउंट थेट टीकटॉकवर स्थलांतरित करण्यासाठी टूल्स देखील देत आहे. याआधी कंपनीने ब्राझील आणि मध्य पुर्वेतील देशांमध्ये देखील हे अ‍ॅप्स बंद केले आहेत.

टीक-टॉकप्रमाणे विगो अ‍ॅप्सला भारतात एवढी लोकप्रियता मिळाली नाही. विगो व्हिडीओचे महिन्याला केवळ 4 मिलियन एक्टिव्ह यूजर्स होते. तर विगो लाईटचे महिन्याला 1.5 मिलियन एक्टिव्ह यूजर्स होते.

Leave a Comment