कोरोनासमोर संपूर्ण जग हतबल; कोरोनाग्रस्तांची संख्या 80 लाखांवर


नवी दिल्ली – जगभरातील बहुतांश देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढताना दिसत आहे. जवळपास 80 लाख कोरोनाबाधित संपूर्ण जगात आहेत. तर आतापर्यंत साडे चार लाख लोकांनी या व्हायरसमुळे आपला जीव गमावला आहे. यासंदर्भात वर्ल्डोमीटरने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत जगभरात 79 लाख 95 हजार 877 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यापैकी 4 लाख 35 हजार 598 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 41 लाख 28 हजार 318 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. जगभरात जवळपास 60 टक्के रुग्ण फक्त 8 देशांमध्ये आहेत. या देशांमध्ये कोरोना बाधितांची संख्या 45 लाखांहून अधिक आहे.

अमेरिकेत कोरोनाचा सर्वाधिक कहर पाहायला मिळत आहे. अमेरिकेमध्ये जवळपास 22 लाख लोक आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर एक लाखांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. परंतु, आता दरदिवशी ब्राझीलमध्ये अमेरिकेपेक्षा अधिक मृत्यूंची नोंद करण्यात येत आहे. ब्राझीलनंतर रूस आणि भारतात कोरोना बाधितांची संख्या जगभरात वेगाने वाढत आहे.

दोन लाखांच्या पार ब्राझील, रूस, स्पेन, यूके, इटली, भारत, पेरूमध्ये कोरोना रुग्णांची संख्या पोहोतली आहे. याव्यतिरिक्त आठ देश असे आहेत, जिथे एक लाखांहून अधिक कोरोना बाधित आहेत. चार देश (अमेरिका, ब्राझील, ब्रिटन, इटली) असे आहेत, जिथे 30 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील मृतांचा आकडा 1.17 लाखांच्या पार पोहोचला आहे. चीन टॉप-17 देशांच्या यादीतून बाहेर पडला आहे. तर कोरोना बाधित टॉप-4 देशांच्या यादीत भारताचा समावेश झाला आहे.

Leave a Comment