आज मुंबईतच सुशांत सिंह राजपूतच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार


मुंबई : रविवारी सकाळी आपल्या राहत्या घरी अभिनेता सुशांत सिंह राजपूतने गळफास घेत आत्महत्या केली. आज मुंबईत सुशांतच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अंत्यसंस्कारासाठी सुशांतचे कुटुंबीय आणि जवळचे नातेवाईक पाटणावरून मुंबईला येणार आहेत. याआधी अशा चर्चा होत्या की, सुशांतच्या पार्थिवावर त्याचे मूळ गाव असलेल्या पाटणा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. परंतु, सुशांतच्या मित्रांनी आग्रह केल्यामुळे मुंबईतच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला आहे.

सुशांतने आत्महत्या का केली? याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, पोलीस आणि त्याच्या मित्रमंडळींनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 6 महिन्यांपासून तो डिप्रेशनमध्ये होता आणि औषधेही वेळेवर घेत नव्हता. पोलिसांना तपासादरम्यान, सुशांतच्या घरातून डिप्रेशन वर उपचार घेत असल्याची सुशांतची फाईल मिळाली आहे. तसेच सुशांत कोणत्या आर्थिक समस्यांचा सामना करत होता का?, हे पाहण्यासाठी पोलिसांनी त्याचे बँक अकाउंट डिटेल्स मागवले आहेत.

Leave a Comment