सुशांत सिंह राजपूतचे पार्थिव अनंतात विलीन


मुंबई – कोरोनामुळे देशात लागू असलेला हा लॉकडाऊनचा काळ हिंदी सिनेसृष्टीसाठी खुपच वाईट ठरत आहे. कारण याच दरम्यान अनेक प्रसिद्ध कलाकारांचे निधन झाले आहे. त्यातच काल बॉलीवूडमध्ये काळजाला चटका लावणारी घटना घडली. बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आपल्या वांद्रयाच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे वृत्त सर्वत्र वाऱ्याच्या वेगाने पसरले.

वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर कूपर हॉस्पिटलमध्ये पोस्टमार्टमसाठी नेण्यात आले होते. आज त्याचा मृतदेह विर्लेपार्ल्यातील स्मशानभूमीत नेण्यात आल्यानंतर, त्याच्या कुटुंबियांकडून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सुशांतच्या वडीलांना त्याच्या पार्थिवास मुख्गानी दिली. त्याच्या अंत्यदर्शनासाठी स्मशानभूमीत सुशांतच्या कुटूंबियांसह अभिनेत्री श्रद्धा कपूर, क्रिती सेनॉन, दिग्दर्शक अभिषेक कपूर यांच्यासह अनेक कलाकार दाखल झाले आहेत.

सुशांतसिंग राजपूत सारख्या कलाकाराच्या अचानक एक्झिटमुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच अभिनेता अक्षय कुमार, माधुरी दीक्षित, करिना कपूर, करण जोहर यांच्यापासुन अगदी किरण मोरे, सचिन तेंडुलकर यांच्यासारख्या दिग्गजांनी सुशांतला श्रद्धांजली अर्पण करत हळहळ व्यक्त केली आहे.

Leave a Comment