सुशांत सिंह राजपूत वरून का ट्रोल होत आहेत आलिया भट्ट आणि करण जोहर

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येने त्याच्या कुटुंबासह सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. त्याचे चाहते आणि सहकलाकार त्याला सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहत आहेत. सुशांतचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली. करण जोहर आणि आलिया भट्टने देखील त्याच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर भावना व्यक्त केल्या.

आपल्या ट्विटमध्ये करणने म्हटले की, यावर विश्वासच बसत नाही आहे. सोबतच सुशांत सोबतच्या जुन्या आठवणी शेअर केल्या. आलियाने लिहिले की, मोठा धक्का बसला आहे. किती वाईट वाटत आहे हे बोलण्यासाठी शब्द नाहीत.

https://twitter.com/NtrArya/status/1272426115114532864

मात्र आलिया आणि करणचे बोलणे चाहत्यांना आवडले नाही. नेटकऱ्यांनी या दोघांवरही निशाणा साधला.  चाहते करण आणि आलियाला फेक म्हणत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की करण आणि आलिया तेच आहेत ज्यांनी कॉफी विद करण या कार्यक्रमात सुशांत कोण आहे असे म्हटले होते. टिव्ही कलाकार असल्याने दोघांनी त्याची खिल्ली उडवली होती. या कार्यक्रमाचे क्लिप्स देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

याशिवाय आणखी एक क्लिप व्हायरल होत आहे ज्यात सुशांतने सांगितले की करण जौहरने त्याला काम देण्यास मनाई केली होती. नेटकरी त्यांच्यावर नेपोटिझमचा आरोप करत त्यांना ट्रोल करत आहेत.