धोनीच्या प्रशिक्षकांनी सांगितले, असा शिकला होता सुशांत ‘हेलिकॉप्टर शॉट’

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने काल गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या चित्रपटांपैकी त्याने ‘एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या धोनीच्या आयुष्यावरील चित्रपटात साकारलेली मुख्य भूमिका लोकांच्या विशेष लक्षात राहिली. या चित्रपटासाठी सुशांतने खूप मेहनत घेतली होती. यासाठी तो धोनीचे लहानपणीचे प्रशिक्षक केशव बॅनर्जी यांच्याकडे देखील गेला होता. जेणेकरून तो धोनीचा स्पेशल हेलिकॉप्टर शॉर्ट शिकू शकेल.

बॅनर्जी म्हणाले की, सुशांत खूपच चांगला व्यक्ती होता आणि त्याने चित्रपटासाठी हेलिकॉप्टर शॉट, धोनी सारख्या गोष्टी शिकण्यासाठी त्यांच्याशी संपर्क केला होता. तो खूपच चांगल्या पद्धतीने वागायचा. बातम्या बघून माझा विश्वासच बसत नाही आहे.

त्यांनी सांगितले की, मला आठवते की जेव्हा तो रांची आला होता त्यावेळी आम्ही खूप वेळ बोलत होतो. धोनीचे मित्र देखील तेथे होते. तो नेहमीच मला म्हणायचा दादा, धोनीचा हेलिकॉप्टर शॉट शिकवा ना. तो मला विचारत असे की माही कसा खेळतो, त्याच्या चेहऱ्यावर हावभाव कसे असतात. तो खूपच केंद्रीत होता. एकतर्फी समर्पण. त्यामुळे गोष्टी व्यवस्थित झाल्या. तुम्ही म्हणूच शकत नाही की तो धोनी नाही. मात्र आज माझ्याजवळ केवळ आठवणी आहेत.

Leave a Comment