अनिल अंबानींच्या अडचणीत वाढ, 1200 कोटींच्या वसूलीसाठी एसबीआयची एनसीएलटीकडे तक्रार

स्टेट बँक ऑफ इंडियाने अनिल अंबानी यांच्याकडून 1200 कोटी रुपये कर्ज वसूलीसाठी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलमध्ये धाव घेतली आहे. रिलायन्स कम्युनिकेशन लिमिटेड आणि रिलायन्स इंफ्राटेल लिमिटेडसाठी अंबानी यांनी बँकेला कर्जाबाबत वैयक्तिक गॅरेंटी दिली होती. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलमध्ये करण्यात आलेल्या तक्रारीसंदर्भात उत्तर देण्यासाठी अनिल अंबानी यांना एका आठवड्याचा कालावधी देण्यात आलेला आहे.

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांनी भाऊ अनिल अंबानीला या आधी देखील मदत करत त्यांना जेलमध्ये जाण्यापासून वाचवले होते. स्टेट बँक ऑफ इंडियाने दिवाळखोरी कायद्याच्या वैयक्ती गॅरेंटी कलमांतर्गत अनिल अंबानी यांच्याविरोधात 1200 कोटी रुपयांच्या वसूलीसाठी तक्रार दाखल केली आहे.

अनिल अंबानींच्या प्रवक्त्यांनी सांगितले की हे कर्ज रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि रिलायन्स इंफ्राटेलचे आहे. अंबानी यांनी बँकेकडून कोणतेही खाजगी कर्ज घेतलेले नाही. कंपनीच्या सावकारांनी मार्च महिन्यात डेब्ट रिझॉल्यूशन योजनेला परवानगी दिली असून, केवळ एनसीएलटीच्या मंजूरीची गरज आहे.

Leave a Comment