अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्या त्या ओळींचा अर्थ या लॉकडाउनमुळे सिद्ध झाला


नवी दिल्ली – काँग्रेस नेते राहुल गांधी हे कोरोनाबाधितांच्या वाढत्या आकडेवारी आणि देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सातत्याने टीका करत आहे. राहुल गांधी लॉकडाउन अपयशी ठरल्याचा मुद्दा पटवून देण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून आकडेवारी व आलेखही शेअर करीत आहे. राहुल गांधी यांनी आजदेखील आणखी एक ट्विट केले आहे. त्यासोबतच अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्या काही ओळी करत हे या लॉकडाउनमुळे सिद्ध झाल्याची टीका राहुल गाधींनी केली आहे.


काँग्रेसचे नेते राहुल गांधी वारंवार केंद्र सरकारने घेतलेल्या लॉकडाउनच्या निर्णयावरून भूमिका मांडत आहेत. राहुल गांधी लॉकडाउन काही प्रमाणात शिथिल केल्यापासून हा लॉकडाउन अपयशी ठरल्याची टीका करीत आहे. त्यांनी यासंदर्भात आलेख आणि आकडेवारीची माहिती देऊन सरकारवर निशाणाही साधला. दरम्यान राहुल गांधी यांनी यासंदर्भात पुन्हा एक ट्विट केले आहे.

भारतीय अर्थव्यवस्था आणि देशातील कोरोनामुळे वाढत असलेल्या मृत्यूच्या संख्येबद्दलचा आलेख राहुल गांधी यांनी ट्विट केला आहे. त्यासोबतच त्यांनी अल्बर्ट आईन्स्टाईन यांचे अज्ञानापेक्षा धोकादायक एकमेव गोष्ट म्हणजे अहंकार, असे एक वाक्यही ट्विट केले आहे. त्यानंतर राहुल गांधी यांनी हे या लॉकडाउनने सिद्ध केल्याची टीका केली आहे.

Leave a Comment