कोरोना : आयसीएमआरने दिली या नव्या टेस्टिंगला मंजूरी, अवघ्या अर्ध्या तासात समजणार रिझल्ट

देशात कोरोनाग्रस्तांच्या टेस्टिंगबाबत सतत चर्चा सुरू आहे. दिल्लीमध्ये कमी टेस्टिंगबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. या सर्वातच आता इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) आणखी एका कोरोना टेस्टच्या तंत्राला परवानगी दिली आहे. आयसीएमआरने अँटीजन टेस्टिंग किट्सला मंजूरी दिली असून, याद्वारे केवळ अर्ध्या तासात टेस्टचे रिझल्ट येतील.

Image Credited – NDTV

अँटिजन टेस्टिंग किट्सचा वापर कंटेनमेंट झोन आणि हेल्थकेअर सेटिंग दरम्यान केला जाईल. या टेस्ट दरम्यान जर एखादी व्यक्ती पॉजिटिव्ह आढळल्यास आरटीपीसीआर टेस्टची गरज पडणार नाही. आयसीएमआरचा दावा आहे की याच्याद्वारे केवळ अर्ध्या तासात कोणत्याही टेस्टचे परिणाम समजतील. आतापर्यंत देशात प्रामुख्याने आरटी-पीसीआर तंत्राद्वारे कोरोना व्हायरसचे सँपल तपासले जाते. याद्वारे 3-4 तासांनी रिझल्ट समजतो. या व्यतिरिक्त ट्रांसपोर्टमध्ये देखील वेळ जातो.

Image Credited – The Economic Times

दरम्यान, सध्या देशात दररोज दीड लाख टेस्ट केल्या जात आहेत. ज्यांचा रिझल्ट 24 तासात येतो. आता सरकार आणखी टेस्टिंग वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.

Leave a Comment