लॉकडाऊननंतर एकापाठोपाठ अनेक कंपन्या आपले स्मार्टफोन्स बाजारात आणत आहेत. पुढील सहा महिन्यात असेच काही शानदार स्मार्टफोन्स बाजारात येणार आहेत. यामध्ये गुगल पिक्सल 4ए, सॅमसंग गॅलेक्सी नोट 20, अॅपल आयफोन 12 या फोन्सचा समावेश आहे. या स्मार्टफोनविषयी जाणून घेऊया.
गुगलपासून ते अॅपलपर्यंत, कंपन्यांचे लाँच होणार हे शानदार स्मार्टफोन्स

गुगल पिक्सल 4 ए –
हा स्मार्टफोन लाँचच्या आधीच विशेष चर्चेत आहे. पिक्सल 4ए मध्ये 5.81 इंच फूल एचडी+ ओलेड डिस्प्ले आणि क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 730 प्रोसेसर मिळण्याची शक्यता आहे. यात 12.2 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सल कॅमेरा मिळू शकतो. गुगल पिक्सल 4ए मध्ये 3080एमएएच बॅटरी मिळेल. फोन ऑक्टोबरमध्ये लाँच होण्याची शक्यता असून, याची किंमत 399 डॉलर (जवळपास 30 हजार रुपये) असेल.

सॅमसंग गॅलेक्सी नोट 20 –
या स्मार्टफोनमध्ये फ्लॅट स्क्रीन मिळू शकते. यात स्नॅपड्रॅगन 865/एक्सीनॉस 992 प्रोसेसर, 16 जीबी पर्यंत रॅम आणि 4300 एमएएच बॅटरी मिळू शकते. कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर यात 108 मेगापिक्सल ISOCELL ब्राइट HM1 सेंसर मिळेल.

अॅपल आयफोन 12 –
अॅपल या वर्षी 4 नवीन आयफोन लाँच करू शकते. यात आयफोन 12, आयफोन 12 प्रो, 12 मॅक्स आणि 12 प्रो मॅक्सचा समावेश आहे. आयफोन 12 प्रो आणि प्रो मॅक्स हँडसेटमध्ये 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट मोशनप्रो डिस्प्ले असेल. या फोन्समध्ये अॅपल ए14 बायॉनिक चिपसेट असेल. चांगल्या एआर फीचर्ससाठी अतिरिक्त LiDAR सेंसर, डेप्थ रिकग्निशन आणि साइडला फ्लॅट बेजेल देण्यात येईल. हे फोन नेव्ही रंगात उपलब्ध होतील.