येत्या १९ तारखेपासून देशामधील ‘या’ राज्यातील प्रमुख शहरामध्ये पुन्हा पूर्णपणे लॉकडाउन


नवी दिल्ली – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशातील कोरोनाबाधितांच्या संख्या कमी होण्यापेक्षा उलटी वाढूच लागली आहे. यापेक्षा वेगळी परिस्थिती तामिळनाडूतही नाही. तिथे कोरानाबाधितांच्या आकड्यात सातत्याने वाढत असल्यामुळे तामिळनाडूतील सरकारने चार जिल्ह्यांमध्ये १९ जून ते ३० जूनपर्यंत पूर्णपणे लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे. तामिळनाडूतील चेन्नई, चेनगालपट्टू, थिरुवल्लूर आणि कांचीपूरम या चार जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा, रुगणालय, चाचणी लॅब आणि वैद्यकीय सेवांना वगळता पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात येणार आहे.

त्याचबरोबर प्रोटोकॉलनुसार विमान आणि ट्रेन सेवा सुरु राहतील. अत्यावश्यक सोडल्यास टॅक्सी आणि रिक्षांना रस्त्यावर अजिबात परवानगी नसणार आहे. गाडयांचा वापर करु नका तसेच घरापासून दोन किलोमीटरच्या परिसरातूनच जीवनावश्यक वस्तुंची खरेदी करा असे आवाहन तेथील स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच सरकारी कार्यालये ३३ टक्के उपस्थितीसह सुरु राहतील. पण कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांना कामावर येऊ नका असे सांगण्यात आले आहे. तामिळनाडूत रविवारी १,९७४ नव्या कोराना रुग्णांची नोंद झाली. तर राज्यात आतापर्यंत ४४,६६१ जणांना कोरानाची लागण झाली असून ४३५ जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment