व्हॉट्सअ‍ॅप पाठोपाठ आता फेसबुक मेसेंजरमध्ये आले हे भन्नाट फीचर

सोशल नेटवर्किंग साईट फेसबुक आपल्या मेसेंजर अ‍ॅपवर नवीन फीचरचे टेस्टिंग करत आहे. या फीचरद्वारे मेसेंजर अ‍ॅपला एडिशनल सिक्युरिटी मिळेल. रिपोर्टनुसार, मेसेंजर अ‍ॅपमध्ये बायोमॅट्रिक ऑथेंटिकेशन टूल मिळेल. ज्याचा उपयोग युजर्स फेस आयडी अथवा फिंगरफ्रिंटद्वारे करू शकतील. हे फीचर आधीच व्हॉट्सअ‍ॅपमध्ये देण्यात आलेले आहे. या फीचरच्या मदतीने युजर अ‍ॅपमध्ये लॉक टायमिंग देखील सेट करू शकतील.

या फीचरच्या मदतीने युजर्सला अ‍ॅपला लॉक करण्यासाठी 4 पर्याय मिळतील. यात एक पर्याय अफ्टर आय लिव्ह मेसेंजर देखील आहे. म्हणजेच या मधून बाहेर पडताच अ‍ॅप लॉक होईल. याशिवाय युजर 1 मिनिट, 15 मिनिट आणि 1 तासांचा पर्याय निवडू शकतील. रिपोर्टनुसार या फीचरचे सध्या टेस्टिंग सुरू आहे व काही आयओएस युजर्स याचा वापर करू शकतात. लवकरच अँड्राईड युजर्ससाठी देखील हे फीचर येणार आहे. मेसेंजरवर हे फीचर व्हॉट्सअ‍ॅपप्रमाणेच काम करेल. मात्र यात तीनच्या ऐवजी 4 पर्याय मिळतील.

Leave a Comment